दिल्लीत आज 1330 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26334 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत दिल्लीत 708 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आज सर्वाधिक म्हणजेच 139 जणांचा कोरोनामुळे बळी तर 2436 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 80 हजारांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, मुंबईती झवेरी बाजारातील काही दुकाने सम-विषम दिवसाच्या आधारावर खुली झाली आहे. यात सोशल डिस्टंसिंगचे देखील नियम पाळण्यात येत आहे. पाहा फोटोज
उत्तर प्रदेश कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या 24 तासांत राज्यात 502 नवे रुग्ण आढळले आहेत. या राज्यात आतापर्यंत एकूण 257 रुग्ण दगावले असून 5648 रुग्ण बरे झाले आहेत.
उत्तराखंड मध्ये 46 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1199 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 874 रुग्णांवर उपचार सुरु असून 11 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पंचनाम्यांना 8-10 दिवस लागणार असून शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन सर्व गोष्टींची काळजी घेत रायगडला 100 कोटींची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) रायगड जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. चक्रीवादळामुळे अनेकांची घरे कोलमडून गेली तर अनेकांचे संसार उघडल्यावर पडले. आज पावसाचा जोर कमी झाल्यामुळे येथील परिसराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत. आज सकाळी 11.30 मिनिटांनी गोल्डन गेट ने रो-रो बोटीतून मांडला जेटीकडे प्रस्थान करतील. अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तसेच येथील नुकसानग्रस्त नागरिकांसी देखील बातचीत करतील.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका जरी शमला असला तरीही कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट महाराष्ट्रावर अजूनही घोंगावत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर भारतात 2,16,919 एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. देशात आतापर्यंत 6075 कोरोना रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.