महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 748 वर; आज नवीन 113 रुग्णांची नोंद; 5 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

06 Apr, 05:20 (IST)

महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्ण संख्या 748 झाली आहे. आज नवीन 113 रुग्णांची नोंद झाली. आज 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबादचे आहेत. 

06 Apr, 05:01 (IST)

महाराष्ट्र सायबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल पर्यंत, कोविड -19 बद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरूद्ध, महाराष्ट्रात 85 खटले दाखल करण्यात आले आहेत. यात बनावट ऑडिओ क्लिप्स, फोटो आणि टिक- टॉक व्हिडिओंचा समावेश आहे.

06 Apr, 04:34 (IST)

रविवारी महाराष्ट्रातील सोलापूर शहरातील विमानतळावर भीषण आग लागली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अहवालानुसार विमानतळाभोवती कोरडे गवत आहे आणि त्यामुळे ही आग वाढत गेली.

06 Apr, 04:20 (IST)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील स्थानिक अडचणी व उपयुक्त सूचनांच्या अनुषंगाने, सोमवार दि. 6 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता शरद पवार त्यांच्या https://bit.ly/2UzvZtc या फेसबुक पेजवरून लाइव्हद्वारे संवाद साधणार आहेत.

06 Apr, 03:37 (IST)

हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) चे मालक महेश अग्रवाल यांचे सिंगापूरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. ते यकृताच्या गंभीर आजारामुळे त्रस्त होते व गेल्या तीन महिन्यांपासून तिथल्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार चालू होते. 

06 Apr, 03:19 (IST)

दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या निवासस्थानावरील सर्व दिवे बंद करुन, दीप प्रज्वलित केले. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी त्यांनी जनतेला दिवे पेटवण्याचे आवाहन केले होते.

06 Apr, 02:53 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर मुंबईचे काही खास क्षण टिपले आहेत. मुंबई दिव्यांच्या आरासाने झगमटून उठली असून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

06 Apr, 02:48 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  दिवे लावण्याचा आवाहनावर घराबाहेर लावले दिवे लावले आहेत.

06 Apr, 02:33 (IST)

तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याचा आवाहनावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. तर आता देशातील संपूर्ण नागरिकांकडून कोरोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी घरातील लाईट्स बंद करुन दिवे लावले जाणार आहेत.

06 Apr, 02:14 (IST)

हरियाणा येथे 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

06 Apr, 02:04 (IST)

लखनौ येथे आणखी 44 कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आकडा 278 वर पोहचला आहे.

06 Apr, 01:39 (IST)

मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सदर व्यक्ती गेल्या 5  दिवसांपासून ती व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

06 Apr, 01:18 (IST)

भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3577 वर पोहचली असून आतापर्यंत 83 जणांचा मृत्यू झाला आहे. 

06 Apr, 01:07 (IST)

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 748 वर पोहचली असून आज 113 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

06 Apr, 24:52 (IST)

मुंबई पुणे दरम्यान होणारे ट्राफिक पाहता 190 जुना पुल तोडण्यात आला आहे.

06 Apr, 24:41 (IST)

Coronavirus: पुणे येथे तांझानिया येथील नागरिकांवर क्वारंटाइन आणि व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06 Apr, 24:11 (IST)

कर्नाटक येथे कोरोना व्हायरसचे 151 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

05 Apr, 23:44 (IST)

मुंबईत कोरोना व्हायरसचे नवे 103 रुग्ण आढळून आल्याने आकडा 433 वर पोहचला असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

05 Apr, 23:37 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाबाधितांचा आकडा 86 वर पोहचला असून यामधील 85 जणांनी दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

05 Apr, 23:09 (IST)

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी MHRD यांच्याकडून PM Cares Fund साठी 38 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल म्हणजेच आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं आहे. रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता आहे, असा इशारा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी देशातील कोरोना बाधितांची संख्या 3113 इतकी होती. यात 2825 सक्रिय केसेस असून 212 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज या आकडेवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या 635 वर जाऊन पोहोचली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

जगभरात कोरोना विषाणुमुळे हाहाकार माजला आहे. जगभरात आतापर्यंत 11 लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 63 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय इटलीमध्ये आतापर्यंत 15 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement