निसर्ग या चक्रीवादळामुळे पालघर, पुणे आणि रायगडसह 14-15 जिल्ह्यात नुकसान; 4 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि कोरोना अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले रहा...

05 Jun, 05:04 (IST)

पालघर, पुणे आणि रायगडसह 14-15 जिल्ह्यात निसर्ग या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणाबाबचा अहवाल राज्य सरकार देण्याचे आदेश दिले आहेत.  महाराष्ट्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

05 Jun, 04:28 (IST)

गुरुवारी, भारताने Global Alliance for Vaccines and Immunisation साठी 15 दशलक्ष डॉलर्सची देणगी देण्याचा निर्णय घेतला.

05 Jun, 03:45 (IST)

ट्विटरवर आसिफ खान नावाच्या व्यक्तीने हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते, या प्रकरणी गो एयर एअरलाइन्सने या केबिन क्रू मेंबरला टर्मिनेट केले आहे.

05 Jun, 03:04 (IST)

कोविड-19 मुळे पुढील आदेश होईपर्यंत, संसदेत खासदारांच्या 'पीए'वर  प्रवेशबंदी प्रतिबंधित, लोकसभा सचिवालयाने ही माहिती दिली

05 Jun, 02:38 (IST)

मुंबईत आज 1442 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे आणि 48 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण सकारात्मक घटनांची संख्या 44,704 वर पोहोचली आहे व मृतांचा आकडा 1465 झाला आहे.

05 Jun, 02:27 (IST)

गुजरातमध्ये आज 492 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18, 601 वर पोहोचली आहे.

 

05 Jun, 01:25 (IST)

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनामुळे 123 जणांचा मृत्यू झाला तर 2933 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह  आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे.

05 Jun, 24:53 (IST)

पंजाबमध्ये आज 39 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2415 वर पोहोचली आहे.

 

05 Jun, 24:14 (IST)

कर्नाटकमध्ये आज 257 नवे कोरोना रुग्ण आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

04 Jun, 23:34 (IST)

गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. 

 

 

04 Jun, 22:50 (IST)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्र लिहिले आहे.  यात त्यांनी मुंबईतील कोवीड चाचण्यांची घटती संख्या आणि वाढत्या मृत्यूदरासंदर्भात टीका केली आहे.

04 Jun, 22:18 (IST)

कोविड-19 च्या 60 नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1145 वर पोहचली आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

04 Jun, 21:42 (IST)

कोविड-19 च्या 23 नव्या रुग्णांसह धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा 1872 वर पोहचला आहे. तर एकूण 71 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

04 Jun, 21:02 (IST)

Unlock 1: महाराष्ट्र राज्यातील दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

04 Jun, 20:53 (IST)

जम्मू-काश्मीर: कुलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 1 नागरिक जखमी झाला आहे. दरम्यान शोध मोहीम सुरु आहे.

04 Jun, 20:10 (IST)

मुंबईतील सायन परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून जागोजागी पाणी साचले आहे.

04 Jun, 20:07 (IST)

महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण 2,500 पोलिस कोविड-19 पॉझिटीव्ह आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

04 Jun, 19:30 (IST)

दिल्लीमध्ये आज आझादपूर येथे शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग लागली आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. 

04 Jun, 18:55 (IST)

रायगड: निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर अलिबाग येथे NDRF कडून पुनर्वसनाचे काम सुरु आहे.

04 Jun, 18:18 (IST)

आंध्रप्रदेश राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3377 वर पोहचाल आहे तर एकूण 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती राज्याच्या कोविड-19 नोडल अधिकाऱ्याने दिली आहे.

Read more


निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईवरील संकट टळले. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्या भागात एनडीआरएफच्या पथकाकडून पुनर्वसनाचे काम सुरु झाले. दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळल्यानंतर आज मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेरची वाट धरली. दरम्यान देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार केला असून 5 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर तयारी करत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान जॉर्ज फ्लॉयड नामक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान अमेरिकेतील महात्मा गांधींच्या पुतळयाची  विटंबना करण्यात आली. गांधीजींचा हा पुतळा वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now