Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3320 नवे रुग्ण आढळले असून 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत भारतात कोरोनाचे एकूण 59,662 रुग्ण आढळले असून 1981 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात 39,834 रुग्णांवर उपचार सुरु असून 17847 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन देखील ठेवण्यात आला आहे.

भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात सद्य स्थितीत 19063 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

त्यापाठोपाठ गुजरात मध्ये 7402 रुग्ण आढळले असून दिल्लीत 6318 रुग्ण आढळले आहेत.

पाहूया राज्यानुसार कोरोना संक्रमितांची संख्या:

S. No. Name of State / UT Total Confirmed cases (Including 111 foreign Nationals) Cured/Discharged/

Migrated

Deaths ( more than 70% cases due to comorbidities )
1 Andaman and Nicobar Islands 33 33 0
2 Andhra Pradesh 1887 842 41
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 59 34 1
5 Bihar 571 297 5
6 Chandigarh 150 21 1
7 Chhattisgarh 59 38 0
8 Dadar Nagar Haveli 1 0 0
9 Delhi 6318 2020 68
10 Goa 7 7 0
11 Gujarat 7402 1872 449
12 Haryana 647 279 8
13 Himachal Pradesh 50 38 2
14 Jammu and Kashmir 823 364 9
15 Jharkhand 132 52 3
16 Karnataka 753 376 30
17 Kerala 503 484 4
18 Ladakh 42 17 0
19 Madhya Pradesh 3341 1349 200
20 Maharashtra 19063 3470 731
21 Manipur 2 2 0
22 Meghalaya 12 10 1
23 Mizoram 1 0 0
24 Odisha 271 63 2
25 Puducherry 9 6 0
26 Punjab 1731 152 29
27 Rajasthan 3579 1916 101
28 Tamil Nadu 6009 1605 40
29 Telengana 1133 700 29
30 Tripura 118 2 0
31 Uttarakhand 63 46 1
32 Uttar Pradesh 3214 1387 66
33 West Bengal 1678 364 160
Total number of confirmed cases in India 59662* 17847 1981
*States wise distribution is subject to further verification and reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाउनमुळे (Lockdown) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत करण्यासाठी 'वंदे भारत मिशन'चा (Vande Bharat Mission) दुसरा टप्पा 15 मेपासून सुरू होणार आहे. न्यूज एजन्सी एएनआयने शेअर केलेल्या ट्विटनुसार रशिया, जर्मनी, थायलंड, फ्रान्स, स्पेन, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान सारख्या इतर देशांतून भारतीयांना या दरम्यान स्वदेशी परत आणले जाईल. यात फीडर उड्डाणे देखील असतील.