Lockdown5 आणि Unlock1 च्या अनुषंगाने पुणे शहरातील नियमावली सोमवारी प्रसिद्ध होणार ; 31 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

01 Jun, 05:13 (IST)

Lockdown5 आणि Unlock1 च्या अनुषंगाने पुणे शहरातील नियमावली सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. यात राज्य सरकारने दिलेले निर्देश आणि स्थानिक पातळीवर दिलेली मुभा, याला अनुसरून ही नियमावली तयार केली जाते.

 

01 Jun, 04:38 (IST)

पुण्यात गेल्या 24 तासांत 285 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7750 वर पोहोचली आहे. तसेच आज 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुण्यात 4502 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

01 Jun, 04:09 (IST)

राज्यात १५ ते ३१ मे या काळात ६ लाख ६८ हजार ६४५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री. दिवसभरात ६३ हजार ९६२ ग्राहकांना घरपोच मद्य, यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगरात ४१ हजार ५३४ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री, करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

01 Jun, 03:15 (IST)

येत्या रविवारपासून महाराष्ट्रात वृत्तपत्रांच्या दारात डिलिव्हरीस परवानगी - उद्धव ठाकरे

01 Jun, 02:37 (IST)

येत्या काळात आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:34 (IST)

शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु होणार याकडे लक्ष देण्यात येणार आहे. 

01 Jun, 02:33 (IST)

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायची इच्छा असल्यास त्यांच्यासाठी सुद्धा संधी देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:31 (IST)

राज्यात तातडीने परीक्षा घेणे अशक्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊ पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

01 Jun, 02:29 (IST)

पियुष गोयल यांनी राज्याला ट्रेन दिल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. 

01 Jun, 02:28 (IST)

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  90 कोटीपर्यंत खर्च करण्यात आले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:27 (IST)

संसर्ग रोखणे, तीव्रता रोखणे, मृत्यूदर घटवणे हेच  सरकारचे उद्दिष्ट असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:26 (IST)

महाराष्ट्रात ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:23 (IST)

राज्यातील कोरोना चाचणी केंद्रांची संख्या 100 करणार असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:19 (IST)

पुढील रविवार (7 जून) पासून वृत्तपत्र घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

01 Jun, 02:16 (IST)

राज्यात आतापर्यंत कोरोनाचे  65 हजार रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 28 हजारांच्या आसपास रुग्णांची प्रकृती सुधारल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:14 (IST)

राज्यातील 55-60 वर्षावरील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:11 (IST)

येत्या 5 जून पासून Odd-Even पद्धतीने दुकाने सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

01 Jun, 02:10 (IST)

पुढचे काही दिवस कोरोना संबंधितचे नियम काटेकोरपणे पाळा असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

01 Jun, 02:07 (IST)

कोरोनाच्या परिस्थितीत घराबाहेर पडताना तोंडावार मास्क लावणे अनिवार्य असणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

01 Jun, 02:06 (IST)

येत्या 2-3 दिवसात चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाण्याचे टाळावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज 31 मे रोजी आपल्या मन की बात (Maan Ki Baat) कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रमाचे प्रक्षेपण दूरदर्शन व आकाशवाणी वरून केले जाईल. केंद्र सरकार द्वारे कालच लॉक डाऊन 5.0 (Lockdown 5.0) संदर्भात महत्वाचा निर्णय घेऊन देशातील कंटेन्टमेंट झोन्स (Containment  Zones) मध्ये 30 जून पर्यंत म्हणजेच आणखीन पुढचा एक महिना लॉक डाऊन कायम ठेवण्याचे घोषित करण्यात आले आहे. या संदर्भात आज मोदी सविस्तर माहिती देण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या 1 जून रोजी केरळात पाऊस धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यानुसार आज पासूनच या भागात पावसाची चिन्हे दिसत आहेत का याचा अभ्यास केला जाईल. काल रात्री हिमाचल प्रदेश मध्ये जोरदार पाऊस झाला होता. तर त्याआधी मुंबईतील काही भागात सुद्धा पावसाने हजेरी लावली होती. केरळात उद्या वेळेत मान्सून दाखल झाल्यास अन्य देशभरात जून च्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून सुरु होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. आज घडीला देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,73,763 आहे. यापैकी सद्य स्थितीत देशात 86,422 रुग्णांवर उपचार सुरु असून 82,370 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत तर कोरोनाचा मृतांचा एकूण आकडा 4971 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाच्या प्रसाराचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्रावर दिसून आला आहे. ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्रात आज कोरोनाचे तब्बल 65 हजार 168 रुग्ण आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

breaking news Coranavirus in Mumbai Coronavirus Lockdown Coronavirus Pandemic Coronavirus Positive Cases in Maharshtra Coronavirus Update Coronavirus update 31 May Coronavirus updates Jammu-kashmir Latest Marathi News Live Breaking News Headlines Locust Attack Maan Ki Baat maharashtra news Marathi News Monsoon Update PM Narendra Modi कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट कोरोना व्हायरस अपडेट 31 मे कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस अलर्ट कोरोना व्हायरस भारत कोरोना व्हायरस महाराष्ट्र कोरोना व्हायरस मुंबई कोरोना व्हायरस मृत्यू कोरोना व्हायरस रुग्णसंख्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन कोविड-19 जम्मू काश्मीर टोळधाड ताज्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रेकिंग न्यूज मन की बात मन की बात 31 मे मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र लाईव्ह ब्रेकिंग न्यूज मान्सुन अपडेट
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement