असाममध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज 74 नव्या कोरोनाबाधितांच्या भर पडली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 830 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
लॉकडाउनमुळे रेल्वेच्या मालवाहतुकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 8,283 कोटी रुपयांची घट झाली आहे. 607 कोटी रुपयांनी वाढलेल्या धान्याच्या उत्पन्नाशिवाय इतर सर्व मालवाहतुकीला मोठा धक्का बसला आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. पीटीआयचे ट्वीट-
केरळ येथील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांना जाब विचारला आहे. वन्य जीव संरक्षक मंत्री जे या तालुक्यातील आहे त्यांनीही राजीनामा दिला जावा. मनेका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी त्याच क्षेत्रातील आहेत त्यांनी कारवाई का केली नाही? एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात आज 2560 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 74860 वर पोहोचली आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात आज दोन आणि सायंकाळी २१ असे एकूण २३ कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आता नांदेड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७५ झाली आहे. यापैकी १२४ रूग्ण बरे झाले आहेत. ४३ रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना विषाणूमूळे ८ रूग्ण मृत्यू पावले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शेतकर्यांना (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व शेत सेवा अध्यादेश, 2020’ या करारास मान्यता दिली आहे. या करारामुळे मोठ्या तसेच किरकोळ विक्रेते, निर्यातदारांना फायदा होणार आहे.
आम्ही स्थलांतरित मजूरांना परत आणण्यास तयार नसल्याची चुकीची माहिती काही लोक परसवत आहेत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान ममता बनर्जी पश्चिम बंगाल राज्यात त्यांना प्रवेश नाकारत असल्याची माहिती समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी ममता बनर्जींना पत्रही लिहिले होते.
गोवा: Mangor Hill भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 6 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे. या परिसरातील 40 जणांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे हा परिसर containnment zone म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
उत्तराखंड राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1066 वर पोहचली आहे. त्यापैकी 795 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 259 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोरोना व्हायरस संकटासह भारतावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आज रायगड, पालघर, मुंबई, ठाणे या भागांना बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामध्ये वार्याचा वेग हा 100-110 kmph ते 120kmph पर्यंत असेल. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून एनएडीआरएफच्या टीम्स चक्रीवादळाचा धोका असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दुपारी 1 च्या सुमारास धडकेल, असा अंदाज आहे.
दरम्यान कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची वाढ देशासह महाराष्ट्रात कायम आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 198706 वर पोहचला असून त्यापैकी 95527 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अद्याप 97581 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 5598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असला तरी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहेत. अनलॉक 1 च्या माध्यमातून विविध टप्प्यात सोयी-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)