पुणे येथे नॅशनल केमिकल लॅबॉरेट्रीमध्ये एका 30 वर्षीय संशोधकाची हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु; 27 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मुंबईत आज 987 रुग्णांची भर पडली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. ट्विट-
कोरोनाबाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट,रॅपीड ॲन्टीजेन कीट व ऑक्सीजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधीसाठा व इतर सुविधांबाबत तपासणी केली आहे. ट्विट-
भारतीय युवा कॉंग्रेसने वाढत्या महागाई, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किंमतींच्या विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले आहे. ट्विट-
उत्तर प्रेदशातल्या एका फरार गुन्हेगाराला ठाणे पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-1ने अटक केली आहे. अटक केलेला गुन्हागार उत्तर प्रदेशातल्या आझमगढ जिल्ह्यात दरोडा टाकून पसार झाला होता. ट्विट-
कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीएमसी आरोग्य विभागाने तीन मंगलकार्यालयावर कारवाई केली. या प्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी 200 ते 300 लोक लग्नासाठी जमले होते.
तुम्ही जेवढा त्रास द्यालं, तेवढ्याच अधिक हिमतीने आणि ताकदीने चित्रा वाघ आपली बाजू भक्कमपणे मांडतील, असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din 2021) म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती दिवशी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटद्वारे सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया. मराठी भाषेला आपल्या साहित्याने समृद्ध करणारे कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
देशातील कोरोना लसीचा आढावा घेतला असता देशात आतापर्यंत 1 कोटी 34 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोनाप्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)