मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून 14 पुस्तकांचे प्रकाशन ; 26 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबईमधील कोरोना बाधितांमधील 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नसल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे व त्यामुळे चिंता वाढल्या आहेत

27 Feb, 05:05 (IST)

मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून 14 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे.

 

27 Feb, 04:53 (IST)

विरोधी पक्ष नेत्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेबाहेर राज्यपालांना रोखण्याचा प्रयत्न केला.

 

27 Feb, 04:44 (IST)

जम्मू-काश्मीरः गुलमर्ग येथे दुसर्‍या #KheloIndiaWinterGames 2021 चे उद्घाटन झाले.

 

27 Feb, 04:31 (IST)

म्यानमारच्या नेतृत्वाला त्यांचे मत शांततापूर्ण आणि विधायक पद्धतीने सोडविण्यासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता, असल्यास मत संयुक्त राष्ट्रसंघाकडे भारतीय स्थायी प्रतिनिधी, टीएस तिरुमूर्ती यांनी व्यक्त केलं आहे.

 

27 Feb, 03:20 (IST)

पुण्यात आज 727 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

27 Feb, 02:36 (IST)

लखनऊ: भारतातील ऑस्ट्रेलियन राजदूत बॅरी ओफरेल यांनी आज यूपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांची भेट घेतली.

27 Feb, 02:02 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 481 रुग्ण आढळले असून 5 जणांचा बळी गेला आहे.

27 Feb, 01:49 (IST)

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केरळचे कौतुक केले पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी उत्तर भारतावर टीका केली असे  केसी वेण्णुगोपाल यांनी म्हटले आहे. 

27 Feb, 01:29 (IST)

काँग्रेस निवडणूकीसाठी पूर्णपणे तयार असून नागरिकांना उत्तम सरकारच्या बदलावासाठी अपील करतो असे केसी वेण्णुगोपाल यांनी म्हटले आहे.

27 Feb, 01:17 (IST)

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 1 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

27 Feb, 24:53 (IST)

बिहार मध्ये 41 वर्षीय महिलेचा लस घेतल्यानंतर 15 दिवसांनी मृत्यू झाला आहे.

27 Feb, 24:40 (IST)

देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 1,37,56,940 लसीकरण झाल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. 

27 Feb, 24:19 (IST)

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणूक पार पडणार असून अन्य राज्यात एक टप्पी निवडणूक होणार असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडून प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहेत.

26 Feb, 23:55 (IST)

अॅन्टी नार्कोटिक्स सेलकडून मुंबईतील आझाद मैदान येथून ड्रग्ज पेडलरला अटक  करण्यात आली आहे.

26 Feb, 23:40 (IST)

कानपूर येथे बर्ड फ्लू नंतर आता 8 कुत्र्यांचा Parvo Virus मुळे मृत्यू झाला आहे.

26 Feb, 23:26 (IST)

आसाम मधील विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील Polls हे 27 मार्चला सुरु होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

26 Feb, 23:07 (IST)

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक 27 मार्चला पार पडणार आहे.

26 Feb, 22:52 (IST)

तमिळनाडू येथे  एक टप्पी विधानसभा निवडणूक येत्या 6 मार्चला पार पडणार  आहे. 

26 Feb, 22:24 (IST)

भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाणने सर्व प्रकारच्या खेळामधून निवृत्ती जाहीर केली.

26 Feb, 21:37 (IST)

काल मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर वाहनात सापडलेल्या जिलेटिनच्या काड्यांबाबत केलेल्या कारवाईनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे, 'मुंबई पोलिसांच्या त्वरित कारवाईबद्दल आम्ही मुंबई पोलिसांचे आभारी आहोत. आमचा विश्वास आहे की मुंबई पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी लवकर पूर्ण करतील.'

 

Read more


देशात कोरोना विषाणू संक्रमण वाढत आहे. राज्य सरकारने पुन्हा एका अनेक निर्बंध घातले आहेत. एकीकडे देश या संकटाशी सामना करीत आहे तर दुसरीकडे गेले अडीच महिने चालू असलेले शेतकरी आंदोलन अजून तीव्र होत आहे. यात भर म्हणजे आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. भारत बंदमध्ये देशभरातून 8 कोटी व्यापारी सहभागी होणार आहेत. यासह ट्रान्सपोर्टर्स ऑर्गनायझेशननेही या दिवशी 'चक्का जाम' जाहीर केला आहे. यावेळी देशभरात सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत वाहतुकीची कोंडी होईल.

जीएसटी व्यवस्था सुलभ करण्याच्या उद्देशाने व्यापाराची सर्वोच्च संस्था, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 26 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

काल मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 1 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत काल 1145 रुग्ण आढळले असून 462 जणांचा आज डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

मुंबईमधील कोरोना बाधितांमधील 80 ते 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नसल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे व त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now