दिल्लीतील कंटेन्मेंट झोनच्या यादीमध्ये 14 नवीन ठिकाणांचा समावेश; 22 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.

23 May, 05:29 (IST)

दिल्लीतील कंटेन्मेंट झोनच्या यादीमध्ये 14 नवीन ठिकाणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची एकूण संख्या 92 झाली आहे.

 

23 May, 04:43 (IST)

लॉकडाऊन काळात नाशिकमध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने'अंतर्गत (मनरेगा) 75 हजार 997 मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर 98 हजार 851 कामे ठेवण्यात आली आहेत. यात 1 लाखापेक्षा अधिक अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. 

23 May, 04:17 (IST)

अमेरिकेहून एअर इंडियाचे विमान दिल्ली येथे दाखल झाले आहे.

 

23 May, 03:58 (IST)

महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात लवकर निर्णय घ्या, अशी सुचना राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

23 May, 03:36 (IST)

राज्यात आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आली.

 

23 May, 03:15 (IST)

थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोव्हीड-19 च्या स्वब तपासणीत, 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळला आहे. यामुळे या लॅबला ठाण्यात कोव्हीड-19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश, मा. महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी दिला आहे.

23 May, 02:54 (IST)

मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

 

23 May, 02:10 (IST)

पश्चिम बंगाल येथे आणखी 135 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आकडा 3322 वर पोहचला आहे.

23 May, 02:01 (IST)

जम्मू-कश्मीर मधील श्रीनगर येथे 2G इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

23 May, 01:48 (IST)

मुंबईत आज नवे 1751 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 27,068 वर पोहचला तर 27 जणांचा बळी गेला आहे.

23 May, 01:37 (IST)

मुंबईतील धारावीत आज आणखी 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1478 वर पोहचला आहे.

23 May, 01:22 (IST)

महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 2940 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 44,582 वर पोहचला आहे.

23 May, 01:11 (IST)

महाराष्ट्र सरकारकडून टीव्ही उत्पादन सुरु करण्याचा विचार करण्यात येत आहे.

 

23 May, 01:07 (IST)

पंजाब येथे कोरोनाबाधितांचा आकडा 2029 वर पोहचला असून 39 जणांचा बळी गेला आहे.

23 May, 24:44 (IST)

गोव्यात आणखी 2 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आकडा 54 वर पोहचला आहे.

23 May, 24:30 (IST)

मुंबईत कंन्टेंटमेंट झोन वगळून दारुची घरपोच विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकानात जाऊन दारु खरेदी करण्यास मनाई असणार आहे.

23 May, 24:12 (IST)

पाकिस्तान येथील विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

22 May, 23:50 (IST)

तमिळनाडू येथे नवे 786 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 14,753 वर पोहचला आहे.

22 May, 23:40 (IST)

आसाम मधील तेजापूर क्वारंटाइन सेंटर मधील आणखी 6 जण कोरोनाग्रस्त आढळून आल्याने आकडा 222 वर पोहचला आहे.

22 May, 23:37 (IST)

अम्फान चक्रीवादळाच्या परिस्थितीसाठी भारत सरकारकडून ओडिशासाठी 500 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Read more


कोरोना व्हायरस (Coranavirus) संकटाविरुद्ध अवघे जग लढते आहे. अद्याप तरी जगाचा हा लढा यशस्वी झाला नाही. प्रयत्न सुरु आहेत. कोरोना व्हायरस रुग्णांची जगभरातील आकडेवारी वाढते आहे. त्याचसोबत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या मृत्यूचीही आकडेवारी वाढते आहे. नाही म्हणायला उपचार घेऊन ठणठणीत बरे होऊन परतणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतू, बरे झालेल्यांना पुन्हा कोरोना होणार नाही याचीही खात्री नाही. त्यात कोरोना व्हायरसवर औषध अथवा प्रतिजैवक असेही काही उपलब्ध नाही. त्यामुळे जगभरातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे.

कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या पाहून जगभरातील देश चिंतेत आहेत. पण ही चिंता केवळ रुग्णवाढीची नाही. त्यासोबत घेण्यात आलेल्या लॉकडाऊन वारंवार लांबवावाव लागतोय ही देखील एक चिंता आहेच. कारण, लॉकडाऊन घेतल्याने जगभरातील अनेक देशांचे व्यवहार ठप्प आहेत. स्थानिक पातळीवरुन ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच व्यवहारांची श्रृंखला खंडीत झाली आहे. त्यामुळे उलाढाल ठप्प आहे. उलाढाल ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर मोठे सकट आले आहे. ही अर्थव्यवस्था मग स्थानिक, प्रादेशिक असो अथवा राष्ट्रीय. सर्वांनाच दणका बसला आहे.

दरम्यान, भारताचा आणि त्यातही महाराष्ट्राचा विचार करायचा तर लॉकडाऊन 4.0 मध्ये उद्योजकांना आपले उद्योग सुरु करण्यास सरकारने सशर्थ परवानगी दिली आहे. गेले महिनाभर बंद असलेले उद्योग हळूहळू सुरु होऊ पाहात आहेत. पण, या उद्योजकांना आता कामगार मिळणे कठीण होऊन बसले आहे. कारण, बहुसंख्य कामगारांनी स्थलांतर करत आपापली मूळ गावं गाठली आहेत.

मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून कामगार परत गेले आहेत. अशा स्थितीत उद्योग सुरु करायचे तर कामगार आणायचे तरी कोठून? असा प्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक कर्मचारी, कामगारांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे तोही एक नवाच प्रश्न निर्माण होऊन बसला आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींची अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now