पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; 22 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई सह देशा-परदेशातील मराठी बातम्या, ठळक घडामोडी, ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टली पेजला नक्की भेट द्या.

23 Apr, 04:21 (IST)

 

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. गेल्या काहि दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोची लागण झाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होती. मात्र, आता इम्रान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह असल्याचे कळल्यावर देशाचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा यांना आनंद व्यक्त केला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

23 Apr, 04:05 (IST)

संपूर्ण देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना छत्तीसगडमधील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथील 2 कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोना मात केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात एकूण 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  एएनआयचे ट्वीट- 

 

23 Apr, 03:00 (IST)

संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विषाणूशी झुंज देत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करणे आणि मृत्यू दर शून्यावर आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच रुग्णांचा कोरोनापासून बचावासाठी आम्ही लक्ष देत असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

23 Apr, 01:54 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 431 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्या 5 हजार 649 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

23 Apr, 24:57 (IST)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता अनेक धार्मिक क्षेत्र बंद ठेवण्यात आले आहेत.  यातच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

 

23 Apr, 24:49 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्या वाढू लागली आहे. यातच तमिळनाडू राज्यात आणखी 33 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

 

23 Apr, 24:05 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. यातच केरळ राज्यात आणखी 11 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी 5 जण परदेशातून आले आहेत, तर 3 जण कोरोबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजत आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

22 Apr, 23:22 (IST)

मुरादाबाद येथे वैद्यकीय पथकावर हल्ला झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, जखमी झालेल्या एका डॉक्टरच्या पत्नीने या घटनेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  डॉक्टर आणि कुटुंबियांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अध्यादेशानंतर डॉक्टरवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ट्वीट-

 

22 Apr, 22:28 (IST)

जम्मू आणि काश्मीर मध्ये 27 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 407 वर पोहोचली आहे.

22 Apr, 22:00 (IST)

मोठ्या जहाजामध्ये coronavirus pandemic मुळे अडकलेल्या 146 भारतीय क्रू कर्मचारी गुरुवारी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात येत आहे.

22 Apr, 21:09 (IST)

लॉकडाऊन बंद असलेली हवाई उड्डाणे पुन्हा कधी सुरु करणार याबाबत कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. त्या त्या वेळेस याबाबत घोषणा करण्यात येईल असेही ते म्हणाले.

22 Apr, 20:40 (IST)

कोव्हिडशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी आता कडक कायदे बनवले जाणार आहेत. हल्लेखोरांना 6 महिन्याची शिक्षा आणि दंडदेखील आकारला जाणार आहे.

22 Apr, 20:32 (IST)

दक्षिण मुंबईमध्ये आज सहा कर्मचार्‍यांसह डॉक्टरला भाटीया रूग्णालयामध्ये लागण झाली आहे. त्यांच्यावर भाटीयामध्येच आयसीयुमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

22 Apr, 20:09 (IST)

भारतामधील कमी लोकसंख्येच्या अनेक भागांमध्ये आता कोरोना फैलाव  मंदावल्याचं चित्र आहे. दरम्यान आज आसामच्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 7 दिवसांमध्ये आसाममध्ये कोणताही नवा कोरोनारूग्ण आढळलेला नाही.

22 Apr, 19:50 (IST)

कोरोना व्हायरसमुळे मंदावलेल्या  जागतिक अर्थव्यवस्थेचा फटका भारतालाही बसला आहे. आज US dollar च्या तुलनेत भारतीय रूपया  76.68 वर स्थिरावला आहे.

22 Apr, 19:10 (IST)

CRPF कडून कोरोना व्हायरस विरूद्ध लढणार्‍या AIIMS रूग्णालयातील आरोग्ययंत्रणेच्या कर्मचार्‍यांसाठी आता CRPF पुढे आलं आहे. त्यांनी सुमारे 1 लाख सर्जिकल फेस मास्क दान केले आहेत.

22 Apr, 18:35 (IST)

Agusta Westland Case प्रकरणी अटकेत असलेल्या Christian Michel याला कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तिहार जेलमधून बाहेर पडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

22 Apr, 17:43 (IST)

मुंबईतील कोरोनाचा  हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीला आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय पथकाने भेट दिली. यावेळेस वेळेस  त्यांनी क्वारंटीन सेंटरला भेट दिली.

22 Apr, 17:37 (IST)

देशभरात कोरोनाचं वार्तांकन करताना पत्रकारही Coronavirus च्या विळख्यात आल्याने आता पत्रकारांनी ऑन फिल्ड काम करताना विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहन केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

22 Apr, 16:38 (IST)

भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यांत आहेत. मागील 24 तासामध्ये 553 नवे रूग्ण वाढल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा 5229 वर पोहचला आहे. तर दिवसभरात काल 19 जणांचा बळी गेला आहे.

Read more


भारतासह जगभरात कोरोना वायरसचा धोका वाढत आहे. भारतामध्ये सध्या 15 हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 3869 जणांवर उपचार झाले असून 640 जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेत. भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 19,984 वर पोहचला आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान जगभरात सध्या अमेरिकामध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. दरम्यान AFP news agency च्या माहितीनुसार काल 24 तासामध्ये 2700 कोरोनाचे बळी गेले आहे. अमेरिकेत दिवसागणिक वाढणारा हा आकडा नागरिकांना अस्वस्थ करणारा आहे.

एकीकडे जागतिक आरोग्य संकटाशी सामना करताना आर्थिक चक्र सांभाळण्याचंही आव्हान आहे. यामध्ये आज करण्यात आलेल्या घोषणेनुसार, फेसबूकने रिलायंस जिओमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान फेसबूक यामध्ये सुमारे 5.7 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान रॅपिड टेस्टिंग कीट सदोष असल्याच्या भीतीमुळे राजस्थानात मोठ्या केल्या जाणार्‍या टेस्ट थांबवण्यात आल्या आहे. दरम्यान दोन प्रकारे केल्या जाणार्‍या टेस्टमध्ये मोठा फरक आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now