डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी गुजरात येथे मिनी मोटेरा स्टेडिअमची उभारणी; 21 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस जगभरातील देशांची डोकेदुखी ठरला आहे. त्याबाबतच्या घटना घडामोडींवरही आज दिवसभरात लक्ष राहणार आहे. याशिवाय स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय बातम्यांबाबतही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. दिवसभरातील ठळक घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.

22 Feb, 05:20 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी गुजरात येथे मिनी मोटेरा स्टेडिअमची उभारणी करण्यात आली आहे.

22 Feb, 04:22 (IST)

शाहिन बाग येथील आंदोलकांसोबत संवाद साधण्यासाठी संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांची सुप्रीम कोर्टाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

22 Feb, 04:03 (IST)

नंदूरबार मधील सेंट्रल किचनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली आहे. या आश्रमात हजारोंच्या संख्येने जेवण बनवले जाते.

22 Feb, 04:03 (IST)

नंदूरबार मधील सेंट्रल किचनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली आहे. या आश्रमात हजारोंच्या संख्येने जेवण बनवले जाते.

22 Feb, 02:51 (IST)

मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष गौतम अमराव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

22 Feb, 02:24 (IST)

मुंबईतील पत्रकारांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ओशिवरा येथे 19 वर्षीय तरुणी नाल्यात वाहून गेल्याच्या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली होती. दरम्यान आज पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. 

 

22 Feb, 02:12 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली

22 Feb, 01:54 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांची तासभर चर्चा झाली.

22 Feb, 01:31 (IST)

पुण्यातील जनता वसाहतमधील कॅनॉलमध्ये 13 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुरेश बागल, असं या मुलाचं नाव आहे. त्यामुळे पुण्यातील कॅनॉल शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

22 Feb, 01:26 (IST)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच दिली वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. वारिस पठाण यांचं वक्तव्य निंदनीय आहे. खरंतर या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेचं देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, हे वारिस पठाण यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

 

22 Feb, 01:21 (IST)

सातारा जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणाची 25 लाखांच्या खंडणीसाठी  हत्या करण्यात आली आहे. तेजस विजय जाधव, असं या तरुणाचं नाव आहे. आरोपींनी तेजसची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत बांधून ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. 

 

22 Feb, 24:23 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 

 

22 Feb, 24:12 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्ली येथे भेट घेतल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्र आणि राज्य सार्कमध्ये कोणतीही ठिणगी नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, पंतप्रधानांनी राज्याच्या वृद्धीसाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे असेही ठाकरे यांनी म्हंटले आहे. 

 

22 Feb, 24:08 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन CAA, NPR आणि NRC वर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. CAA आणि NPR हा देशासाठी घातक नसल्याचे ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे तसेच काहीही झाले तरी NRC राज्यात लागू होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. तसेच आपण राज्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन केले होते, हे वचन पाळण्यासाठी मोदी सुद्धा मदत करतील असे आश्वासन त्यांनी या भेटीत दिल्याचे ठाकरे यांनी म्हंटले आहे. 

 

21 Feb, 23:54 (IST)

नायर रुग्णालयातील रहिवासी डॉक्टर पायल तडवी हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींनी नायर रुग्णालयात काम करू देण्याची विनंती केली होती ही विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. असं असलं तरीही आरोपी डॉक्टरांचे परवाना निलंबन न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे.

21 Feb, 23:37 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील एक तासापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उपस्थित असून या दोघांमध्ये नेमक्या काय चर्चा सुरु आहेत याबाबत थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे माहिती देणार आहेत, या चर्चा सत्राला मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत.

PM Narendra Modi And CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)
21 Feb, 23:20 (IST)

अयोध्येत बुद्ध मंदिर उभारण्यासाठी भूखंड देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे . आमच्या मागणीचा विचार न झाल्यास आम्ही ट्रस्ट स्थापन करून  अयोध्येत जमीन घेऊन तेथे बुद्ध विहार बनवून उभारू असेही त्यांनी सांगितले

21 Feb, 22:56 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नियोजित भेट घेतली आहे. महाराष्ट्र सत्ता संघर्षानंतर ठाकरे आणि मोदी यांची ही पहिलीच भेट असून यामध्ये GST सहित राज्यातील केंद्राच्या योगदानाविषयी चर्चा होऊ शकते.

21 Feb, 22:21 (IST)

उद्धव ठाकरे हे 5  वाजता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, साधारण 30 मिनिटे ही भेट होऊ शकते, तसेच आज रात्री 9 वाजता ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीला जाणार आहेत. 

21 Feb, 22:21 (IST)

दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. आज सायंकाळी 5 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होत आहे. ठरलेल्या वेळानुसार भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा ताफा निघाला आहे.

Read more


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (21 फेब्रुवारी 2020) दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Congress) या तिन पक्षांचे मिळून महाविकाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार का याबाबत उत्सुकता आहे. मागे एकदा आपण मोठे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार का असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला होता. त्यावेळी मी पंतप्रधान मोदी यांना भेटेनच परंतू, भाजप लालकृष्ण अडवाणी यांनाही भेटणार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दुसऱ्या बाजुला महाविकासआघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय जोरदार चर्चेत आहेत. यात शालेय परिक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरुन 'नापास' शेरा हटवून त्या ठिकाणी फेरपरीक्षेसाठी पात्र असा शेरा लिहिण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचेही संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे या निर्णय आणि संकेतांवर आज दिवसभरात काय प्रतिक्रिया उमटते याबाबतही उत्सुकता आहे.

दुसऱ्या बाजूला, अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्र सरकार विशष तयारी करत आहे. गुजरातमध्ये काही कार्यक्रमात ट्रम्प सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. या दौऱ्यावर काहींनी जोरदार टीका सुरु केली आहे. भारतासोबत या दौऱ्यात विशेष डील होणार नाही. झाल्याच तर, त्या किरकोळ स्वरुपाच्या असतील अशा आशयाचे ट्विट ट्रम्प यांनी आगोदरच केले आहे. त्यामुळे जर मोठे डिल होणार नसेल तर, ते या दौऱ्यावर का येत आहे? असा सवाल या दौऱ्याचे टीकाकार विचारत आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस जगभरातील देशांची डोकेदुखी ठरला आहे. त्याबाबतच्या घटना घडामोडींवरही आज दिवसभरात लक्ष राहणार आहे. याशिवाय स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय बातम्यांबाबतही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. दिवसभरातील ठळक घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now