पुणे शहरात आज 1,705 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 34, 040 झाली आहे. आज शहरात 773 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 12, 016 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 1,91,508 झाली असून, आज 6,811 टेस्ट घेण्यात आल्या.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये 37 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एएफपी न्यूज एजन्सीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
यंदा विविध मंडळांकडून 12 वीच्या परीक्षा अंशतः रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आयआयटीने प्रवेश निकष शिथिल केले आहेत. आयआयटीसाठी या वर्षाच्या 12 वीच्या किमान 75 टक्के गुणांच्या निकषांना मान्यता दिली जाईल, असे मानव संसाधन विकास मंत्रालयाने म्हटले आहे.
Housing For All योजनेअंतर्गत येत्या 2022 वर्षापर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकांच्या डोक्यावर सुरक्षित आणि सिक्युअर छप्पर असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मुंबईत गुरुवारी संध्याकाळी (16 जुलै) फोर्ट (Fort) परिसरात भानुशाली इमारतीचा (Bhanushali Building) काही भाग कोसळल्याच्या घटनेने या भागात खूपच खळबळ उडाली आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकाचे बचाव कार्य सुरु आहे. अशात आतापर्यंत 23 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच या दुर्घटनेत एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर झधरला होता. अशा परिस्थितीत कच्च्या वा धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना ब-याचदा घडतात. अशीच घटना काल मुंबईतील फोर्ट परिसरात घडली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरु आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून काल सांताक्रूझ येथे 153.6 mm पावसाची नोंद करण्यात आली. काल मुंबईत समाधानकारक पाऊस झाल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दुसरीकडे संपूर्ण देशाभोवती घोंगावत असलेल्या कोरोना व्हायरस विषाणूबद्दल बोलायचे झाले तर, भारताने कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या बाबतीत 10 लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे. Worldometers नुसार, आज संध्याकाळपर्यंत भारतामध्ये कोरोनाचे 1,004,383 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 25,605 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 6,36,541 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना प्रकरणात भारत जगात तिसर्या क्रमांकावर आहे. मृत्यूच्या बाबतीत भारत सध्या आठव्या क्रमांकावर आहे, परंतु आठवड्यात किंवा दहा दिवसांत तो सहाव्या क्रमांकावर येईल.