Coronavirus Recovery Rate: देशात 37.8 लाखाहुन अधिक रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 78% -आरोग्य मंंत्रालय
कोरोना मुक्त होणार्यांंची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. सध्याच्या माहितीनुसार देशात 37,80,107 रुग्णांंनी कोरोनावर मात (Coronavirus Recovery Rate) केली आहे यातील 77,512 जण तर मागील 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत
COVID 19 Update: केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या अपडेट्सनुसार, भारतात (India) मागील 24 तासांत 92,071 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 48 लाख 46 हजार 428 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचली आहे. कोरोनामुळे आजवर 79,722 (Coronavirus Death Cases) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी कोरोना व्हायरसची गंभीर परिस्थिती दर्शविणारी असली तरी दुसरीकडे कोरोना मुक्त होणार्यांंची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. सध्याच्या माहितीनुसार देशात 37,80,107 रुग्णांंनी कोरोनावर मात (Coronavirus Recovery Rate) केली आहे यातील 77,512 जण तर मागील 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत. यानुसार देशातील कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट हा 78 टक्क्यांंवर पोहचला आहे.
दुसरीकडे देशात सद्य घडीला 9 लाख 86 हजार 598 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या अॅक्टिव्ह रुग्णांंपैकी 60% रुग्ण हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु या पाच राज्यातील असल्याची माहिती आरोग्य मंंत्रालयाने दिली आहे.
ANI ट्विट
77,512 recoveries registered in last 24 hours in India taking the total number of recoveries to 37,80,107 & recovery rate to 78%. More than 60% of active cases are concentrated in 5 States- Maharashtra, Karnataka, Andhra Pradesh, Uttar Pradesh & Tamil Nadu: Health Ministry #COVID
— ANI (@ANI) September 14, 2020
दरम्यान, खासदार आणि कॉंंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांंधी यांंनी आज मोदींंवर टीका करतानाच देशात या आठवड्यात कोरोना रुग्णांंची संख्या 50 लाखाचा टप्पा पार करेल आणि एकुण अॅक्टिव्ह रुग्ण संंख्या सुद्धा 10 लाख होईल असे भाकित वर्तवले आहे.
दुसरीकडे, काल केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन यांंनी येत्या तिमाहीत म्हणजे डिसेंबर ते जानेवारी पर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होईल असे सांंगितले आहे. लोकांंमध्ये भीती किंंवा संशय असल्यास मी स्वतः पहिली लस घेईन असेही हर्षवर्धन म्हणाले होते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2020 01:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

