जम्मू-काश्मीर येथे नाका तपासणी दरम्यान बडगाम पोलिस आणि भारतीय सैन्याने 2 दहशतवाद्यांना अटक केले. हे लष्कर ए तोयबा आणि तहरीक उल मुजाहिद्दीन संघटनेतील आहेत. यांच्याकडून बॅनर, लेटर पॅड, ध्वज जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाजपाला विजयी करण्यासाठी कॉंग्रेस निवडणुका लढवत आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपा आणि आप यांच्यात आहे: दिल्ली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया
प्रवासी ट्रेनच्या शौचालयात (Rape In Train Toilet) एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन (Gorakhpur Express Train) प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.
असाम राज्यातील शिवसागर येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. या वेळी त्यांनी सांगितले की, काहीही झाले तरी सीएए होऊ देणार नाही.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या हल्ल्याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांपूर्वी पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात तब्बल 40 जवान शहीद झाले होते. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे चोख उत्तर पाकिस्तानाला दिले. रात्री 3 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये 100 किमी आत घुसून बालाकोट येथील जैश-ए- मोहम्मद च्या दहशतवादी छावण्यावंर बॉम्बहल्ले केले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसून येत आहे. परंतु. आज त्यात हलकासा सुधार दिसत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 'very poor' ते 'poor' कॅटेगरीपर्यंत पोहचली आहे. मात्र दिल्लीतील हवेची गुणवत्ता अद्यापही 'very poor'अशीच आहे, अशी माहिती हवा गुणवत्ता व हवामान अंदाज व संशोधन प्रणाली यांच्याकडून देण्यात आली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आज सलग 6 व्या दिवशी देखील वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 0.29 रुपयांनी वधारले असून दिल्लीत आज 88.73 रु. प्रति लीटरने पेट्रोल विकले जात आहे. तर डिझेलचे दर 0.32 रुपयांनी वाढले असून 79.06 रु. प्रति लीटर इतके झाले आहेत.