एखाद्या प्रकरणात पूर्ण माहिती नसताना एखाद्या नेत्याचे नाव जोडणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाचे स्वामी जितेंद्र महाराज यांनी व्यक्त केली आहे. ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा संबंध जोडत दिल्या जाणाऱ्या वृत्ताबाबत ते बोलत होते.
राज्यात खळबळ उडवून दिलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एक मोठी माहिती पुढे आली आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे तिचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे.
अमित शाह यांनी लोकसभेत आज काँग्रेस नेते मनीष तिवारी यांना करुन दिली काँग्रेस सरकारची आठवण करुन दिली. ते म्हणाले, मनीष भाई (मनीष तिवारी), कॉंग्रेसचे दिवस आठवा. हजारो लोक मारले गेले, दिवसांसाठी कर्फ्यू लादला. आकडेवारीच्या आधारे परिस्थितीवर बोला. काश्मीरमधील शांतता ही एक मोठी गोष्ट आहे. मला अशांततेचे दिवस आठवायचे नाहीत. असे दिवस पुन्हा (जम्मू-काश्मीर) येणार नाहीत कारण आता ते आमचे सरकार आहे, असे अमित शाह म्हणाले.
काँग्रेस खासदार टी एन प्रतापण यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरुद्ध हंक्कभंगाची नोटीस दिली आहे. लोकसभेतील भाषणादरम्यान, अर्थमंत्री सीतारमण यांनी वायनाडच खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल 'Doomsday man of India' असे उद्गार काढले होते. या उद्गारांवरुनच प्रतापण यांनी ही नोटीस दिली आहे.
लॉकडाऊन काळात नियमीत असलेला विजपूरवठा वपरून आणि वीजबिल भरण्यास पुरेसा अवधी दिला असतानाही काही ग्राहकांनी विजबील भरले नाही, अशा ग्राहकांवर महावितरण कडक कारवाईचे धोरण अवलंबवत आहे. राज्यातील वीज देयक थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक गर्तेत सापडलेल्या वीज महामंडळाने या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी ग्राहकांकडून वीजबिल वसुरी करण्याची मोहीम हती घेतली आहे. त्यामुळे गेली 10 महिने एकदाही विजबील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपूरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
भारत चीन सीमावाद प्रश्नी होत असलेल्या टीकेला केंद्र सरकारने प्रत्युत्तर दिले आहे. पूरव लद्दाख आणि पॅंगॉंग सरोवर भागात दोन्ही देशांचे सौन्य मागे जात आहे. सैन्य माघारीची चर्चा उभय देशांमध्ये सुरु असताना भारताने चीनला कोणत्याही प्रकारचे अश्वासन दिले नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारताने आपल्या हद्दीतील काही भूभाग चीनला दिल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
पूजा चव्हाण नामक एका तरुणीने केलेल्या कथीत आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव पुढे येत आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा यांनी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यवर थेट निशाणा साधत या प्रकरणात राठोड यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. शेतकरी आंदोलन हे सत्ताबदल करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच विचार करावा. केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबविण्यात येईल असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.