पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर ला जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए) आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान (एनआयए) चे उद्घाटन करणार ; 11 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर ला जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था (आयटीआरए) आणि जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान (एनआयए) चे उद्घाटन करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना माझ्या पत्रकारितेत अडचण असेल तर त्यांनी मला मुलाखत द्यावी. मी त्याच्याशी सहमत नसलेल्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चेचे आव्हान देतो, असं रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णब गोस्वामी यांनी एनआयला मुलाखत देताना म्हटलं आहे.
बंगळुरु: कोविड-19 संकटाचा दिवे विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वीही विक्री कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका विक्रेत्यांने सांगितले की, सणासुदीच्या काळात व्यवसायाला उभारी येईल, अशी आशा होती. परंतु, लॉकडाऊनच्या शिथलीकरणानंतरही अत्यंत कमी विक्री होत आहे.
मुंबईत आज कोविड-19 चे 1,069 नवे रुग्ण आढळून आले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 2,66,746 वर पोहचला आहे. यापैकी 2,39,800 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 12,674 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 10,503 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.
मला देशातील जनतेचे आभार मानायचे आहे, त्यांनी भाजपला राज्यभरातील निवडणुका जिंकल्यामुळे नव्हे तर आपल्या सर्वांनी उत्साहाने लोकशाही उत्सवात भाग घेतला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना, अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना दिलासा, नोकरभरती यासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली आणि दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दिल्लीः BiharElections2020 मध्ये एनडीएचा विजय साजरा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या दहावीत आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम चाचणी होणार नाही, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
Worli Seaface Mumbai Public School चा सरकारी शाळांमध्ये राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक आला असून आदित्य ठाकरे यांनी शाळेतील शिक्षक वर्गाचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्री, राज्य आरोग्य मंत्री आणि प्रधान सचिवांशी संवाद साधला. यात महाराष्ट्र, उत्तराखंड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा मेघालय आणि गोवा राज्यांचा समावेश आहे.
देशात हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली असून वातावरणात छान गारवा आला आहे. मात्र दुसरीकडे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील प्रदूषण मात्र दिवसेंदिवस अतिशय खराब होत चालले आहे. या प्रदूषणामुळे (Air Pollution) दिल्लीकरांना (Navi Delhi) अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वाचा साराचार विचार करता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील खराब प्रदूषण पाहता 30 नोव्हेंबर पर्यंत फटाके खरेदी करण्यास वा त्याची विक्री करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. जर नियमांचे उल्लंघन करुन असे प्रकार कोणी करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA ची सत्ता आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जनतेचे आभार मानले आहेत. बिहार विधानसभा निवडणूक आणि अन्य पोटनिवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली. यामुळे मोदींचा करिश्मा अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात काल (10 नोव्हेंबर) कोरोना विषाणूच्या 3,791 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 17,26,926 वर पोहोचली आहे. तर 46 रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 44,435 झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)