भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन; सुभाष देसाई यांनी वाहली श्रद्धांजली;11 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना उपनेते, सच्चे शिवसैनिक सूर्यकांत महाडिक यांच्या निधनाची वार्ता अतिशय वेदनादायक आहे. कामगारांच्या हक्कांसाठी ते कायम संघर्षरत राहिले. महाडिक कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाचे ट्विट सुभाष देसाई यांनी केले आहे. ट्विट-
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभमीवर ममता बॅनर्जी यांनीही मोठे विधान केले आहे. मी फक्त जनेसाठी जगेल आणि काम करेल. एवढेच नव्हेतर, जनतेसाठी मरेलही असे त्या म्हणाल्या आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज सायंकाळी श्रीपाद आणि त्यांची पत्नी कर्नाटकातील येल्लापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे. ट्वीट-
करनाल कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी कृषी कायदा रद्द करा असा सल्ला काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हूडा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना दिला आहे. ट्विट-
महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. आज 4286 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18,67,988 वर पोहोचली आहे.
राजस्थान मध्ये आज दिवसभरात 568 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 3,04,104 कोरोनावर मात केली आहे. तर 429 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,13,425 वर पोहोचली आहे.
देशभरात अनेक राज्यांत फ्रंटलाईन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर्स मिळून 3 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या पहिल्या चरणातील कोरोना लसीचा खर्च हा राज्य सरकार करावा लागणार नसून तो भारत सरकार करणार आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
SII ची कोविशिल्ड लस प्रति बॉटल 200 रूपये असेल अशी माहिती आज सीरम इन्स्टिट्युटकडून देण्यात आली आहे. दरम्यान देशात फेज 1 कोविड 19 लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होत आहे.
Farm Laws बाबत संयुक्त भूमिका घेण्यासाठी सोनिया गांधी यांची विरोधी नेत्यांसोबत चर्चा केली आहे. यंदाच्या संसदीय अधिवेशनापूर्वी मीटींग देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतामध्ये 16 जानेवारी पासून कोविड 19 च्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान कोविडच्या काळातही वाढती रूग्णसंख्या, सोयी-सुविधा यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली होती. आता लसीकरण सार्यांसाठीच मोफत असणार का? हा एक मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये कोविड योद्धे आणि डॉक्टर्स यांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ही लस मोफत उपलब्ध असेल. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरातील लोकांना ती लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी देशात 2 ड्राय रन देखील झाल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोविडची परिस्थिती आटोक्यात येतानाचं चित्र असतानाच आता बर्ड फ्लू ची भीती वाढत आहे. देशात कावळे, बगळे, कोंबड्या यांच्या मृत्यूची प्रकरण वाढत आहेत. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रही बर्ड फ्लू च्या सावटाखाली आहे. अद्याप अधिकृतरित्या बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याची बाब सांगण्यात आलेली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)