खुशखबर! ड्रायव्हिंग लायसन्स च्या नियमामध्ये झाला हा मोठा बदल; 22 लाखांपेक्षा जास्त लोकांना मिळेल रोजगार
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकाराने हाच नियम बदलण्यात आला आहे
देशातील ऑटो (Auto) क्षेत्र कमालीचे वाढत आहे. दररोज रस्त्यावर नव्या गाड्यांची भर पडत आहे. मात्र कमी शिकलेल्या लोकांना सरकार वाहन चालकाचा परवाना (Driving Licence) देत नाही. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकाराने हाच नियम बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहने चालविणारी व्यक्ती आठवी पास असणे यापुढे बंधनकारक राहणार नाही. परिवहन मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्वतः नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.
सध्या देशात 22 लाखांहून आधील वाहन चालकांची गरज आहे. मात्र सरकारच्या आधीच्या नियमानुसार अवजड वाहन परवाना मिळवण्यासाठी किमान 8 वी पास असणे बंधनकार होते. मात्र आता अशिक्षित व्यक्तीलाही वाहन परवाना मिळू शकतो. दूरदृष्टी आणि देशात उपलब्ध असलेले रोजगार याचा विचार करुन, दळणवळण मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. लवकरच याबाबत अधिसूचना जारी करण्यात येईल. (हेही वाचा: सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द)
आतापर्यंत केंद्रीय मोटर वाहन नियमावली, 1989 च्या नियम 8 प्रमाणे वाहन परवाना वितरीत केले जात होते. मात्र आता या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. देशातील लाखो युवकांना रोजगार मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 2016 साली भारतात 4.8 लाख रस्ते अपघात घडले होते, या अपघाताशी संबंध असलेल्यांपैकी 3.35 लाख चालक आठवी पास असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी 8 वी पास असणे गरजेचे नाही, तर ट्राफिकचे नियम माहित असणे गरजेचे आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता.