Mukesh Ambani यांनी आपल्या कर्मचाऱ्याला दिले 1500 कोटींचे घर; जाणून घ्या कोण आहे 'ही' भाग्यवान व्यक्ती
मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम बॉसचे उदाहरण जगाला दिले आहे. त्यांनी मुंबईत त्यांच्या एका कर्मचार्याला 1,500 कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे, पण ही व्यक्ती आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
Mukesh Ambani: देशातील आघाडीच्या औद्योगिक घराण्याच्या म्हणजेच रिलायन्स समूहाच्या चर्चा मीडियात कायम असतात. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या यशामागे त्यांचे कर्मचारी हे एक मोठं कारण आहे. मुकेश आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देतात. मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वोत्तम बॉसचे उदाहरण जगाला दिले आहे. त्यांनी मुंबईत त्यांच्या एका कर्मचार्याला 1,500 कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे, पण ही व्यक्ती आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला 1500 कोटींचे घर दिले आहे. ही व्यक्ती मुकेश अंबानींचा उजवा हात मानला जाते. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून मनोज मोदी आहेत. मनोज मोदी हे मुकेश अंबानींच्या जवळ राहणाऱ्या खास कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत. (हेही वाचा -NCERT Removes Darwin Evolution Theory: NCERT ने विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत)
मुकेश अंबानींनी मनोज मोदींना दिलेल्या घराबद्दल सांगायचे तर, 1.7 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली ही 22 मजली इमारत आहे. हे घर मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधले आहे. या घराची किंमत सुमारे 1500 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे बॅच मेट आहेत आणि दोघांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एकत्र शिक्षण घेतले आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी कंपनीचे नेतृत्व करत असताना मनोज मोदी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला रिलायन्समध्ये सामील झाले. वृत्तानुसार, मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे अनेक दशकांपासून मित्र आहेत. मनोज मोदी आता मुकेश अंबानी यांची मुले आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत काम करत आहेत.
रिलायन्सने केलेल्या अनेक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीपासून अनेक महत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये मनोज मोदींची महत्त्वाची भूमिका आढळून आली आहे. मनोज मोदी सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओमध्ये संचालक म्हणून काम करत आहेत. मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींना भेट दिलेल्या घराची रचना तलाटी अँड पार्टनर्स एलएलपीने केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

