Mizoram Governor Sreedharan Pillai: लॉकडाऊन काळात मिझोराम चे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले तब्बल 13 पुस्तकं
अनेक नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळाचा चांगला वापर केला आहे. अशातचं मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Mizoram Governor Sreedharan Pillai) यांनी लॉकडाऊनच्या काळात चक्क 13 पुस्तकं लिहिली आहेत.
Mizoram Governor Sreedharan Pillai: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळाचा चांगला वापर केला आहे. अशातचं मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Mizoram Governor Sreedharan Pillai) यांनी लॉकडाऊनच्या काळात चक्क 13 पुस्तकं लिहिली आहेत.
पिल्लई यांनी मार्च महिन्यापासून आतापर्यंत 13 पुस्तकं लिहिली आहेत. यात त्यांनी इंग्रजी तसेच मल्याळम भाषेत कविता लिहिल्या आहेत. लॉकडाऊन काळात राजभवनामध्ये कोणीही येत नसल्याने आपल्याला वेळ मिळाला, असंही पिल्लई यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - भारतात गेल्या 24 तासात 7 लाखांहून अधिक COVID19 च्या सॅम्पल्सची टेस्ट, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती)
दरम्यान, श्रीधरन पिल्लई यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊनमुळे मला पुस्तके वाचवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. लॉकडाऊन काळात राजभवनामध्ये कोणालाही येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. लोकांबरोबर माझा संवाददेखील बंद होता. याशिवाय या काळात कोणतेही दौरे नव्हते. मी आपला जास्तीत जास्त वेळ वाचन आणि लिखाणात घालवला. लॉकडाऊन काळात मी सकाळी 4 वाजता उठायचो आणि व्यायाम करायचो, असंही पिल्लई यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Agriculture Infrastructure Fund अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांना वित्त सुविधा देण्याची केली घोषणा)
पिल्लई यांना लहानपणापासून सार्वजनिक जीवनामध्ये आणि ग्रामीण भागातील राजकारणाची आवड होती. लोकांच्या सहकार्यांने राजकारणात येता आलं. त्यानंतरच्या काळात पुस्तक लिहिण्यास प्रेरणा मिळाली. कोरोना संकटाच्या सकारात्मक तसेच नकारात्मक बाजू आहेत. लॉकडाऊनमुळे माणसामाणसांमधील प्रेम वाढण्यास मदत झाली, असंही पिल्लई यांनी यावेळी स्पष्ट केलं.