PM Modi On Selfie With Giorgia Meloni: 'मित्रांना भेटणे हा नेहमीच आनंददायी अनुभव'; जॉर्जिया मेलोनीसोबतच्या सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पोस्ट
मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी पोस्ट केला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या सेल्फिवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी म्हटलं आहे की, 'मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.'
- Read in
- मराठी
PM Modi On Selfie With Giorgia Meloni: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी दुबईतील COP28 हवामान शिखर परिषदेच्या बाजूला त्यांचे इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पोस्ट केलेल्या सेल्फीवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी पोस्ट केला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या सेल्फिवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी म्हटलं आहे की, 'मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.' पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, तुर्कस्तानचे अध्यक्ष आरटी एर्दोगन, स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचीही भेट घेतली. (हेही वाचा - Modi Modi In Dubai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई दौऱ्यावर, एअरपोर्टवर 'अबकी बार मोदी सरकार'चे लागले नारे (Watch Video))
Meeting friends is always a delight. https://t.co/4PWqZZaDKC
— Narendra Modi (@narendramodi) December 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2023 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

