Coal Scam: Mamata Banerjee यांचे पुतणे Abhishek Banerjee यांना ED चे समन्स; कोळसा घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी
ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Coal Scam: कोळसा घोटाळा प्रकरणी (Coal Scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी या प्रकरणात अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांना वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ED प्रथम 21 मार्चला अभिषेक बॅनर्जी यांची आणि त्यानंतर 22 मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी करेल.
ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना पुढील आठवड्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. (हेही वाचा - Russia-Ukraine War: भारतीय न्यायाधीश Dalveer Bhandari यांनी रशियाच्या विरोधात केलं मतदान; ICJ ने दिले युक्रेनमधील युद्ध त्वरित थांबवण्यास आदेश)
मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी या जोडप्याला यापूर्वी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ईडीला निर्देश देण्याची विनंती केली होती की, ते पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने त्यांना दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये.
दरम्यान, या प्रकरणी बॅनर्जी यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय राजधानीतील एका एजन्सीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ने आसनसोल आणि त्याच्या लगतच्या ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींशी संबंधित नोव्हेंबर 2020 च्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे.
कुनुस्टोरिया आणि कजोरा भागात कोट्यवधींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशाचे TMC खासदार लाभार्थी असल्याचा दावा ईडीने केला होता. मात्र, बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.