Karnataka Oath Ceremony: कर्नाटक मंत्रिमंडळात मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांकला स्थान; 'या' आमदारांना मिळाले मंत्रीपद

कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय आमदार सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे शपथ घेतली.

Dr G Parameshwara, KH Muniyappa, KJ George and MB Patil (PC - ANI)

Karnataka Oath Ceremony: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी आज कर्नाटक (Karnataka) च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियमवर दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी झाले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशिवाय आमदार सतीश जारकीहोळी, डॉ. जी. परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कर्नाटक सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे शपथ घेतली. (हेही वाचा - Rahul Gandhi On Karnataka Government: 'दिलेली अश्वासने 2 तासांमध्ये अमलात आणू', सिद्धरमैय्या, डीके शिवकुमार यांच्या शपतविधी सोहळ्यात राहुल गांधी)

काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यानंतर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांशिवाय आणखी आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

जी परमेश्वरा आणि प्रियांक खर्गे दलित समाजातून आले आहेत. याशिवाय मुनिअप्पा हे देखील दलित समाजातून येतात. तर जमीर अहमद खान आणि केजे जॉर्ज हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. यासोबतच सतीश जारकीहोळी हे अनुसूचित जमातीतील आहेत, तर रामलिंगा रेड्डी हे रेड्डी जातीतील आहेत. त्याच वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कुरुबा समाजाचे आहेत आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार वोक्कलिगा समुदायाचे आहेत.

प्रियांक खर्गे -

प्रियांक खर्गे यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2023 ची विधानसभा निवडणूक जिंकून प्रियांक खर्गे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 2008 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागेवरून प्रियांक खर्गे सध्या आमदार आहेत, त्या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले.

केजे जॉर्ज - 

केलचंद्र जोसेफ जॉर्ज एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. याशिवाय त्यांनी कर्नाटकच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. ते वीरेंद्र पाटील सरकारमध्ये परिवहन, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि एस बंगारप्पा सरकारमध्ये गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री होते. केजे जॉर्ज 1968 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.

जी परमेश्वर -

काँग्रेस नेते जी परमेश्वरा हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही राहिले आहेत. काँग्रेस-जेडी(एस) युती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. जी परमेश्वर 6 वेळा आमदार आहेत. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली.

सतीश जारकीहोळी -

सतीश जारकीहोळी हे कर्नाटकातील प्रभावशाली नायक/वाल्मिकी समाजाचे असून या कुटुंबातील सदस्यांना बेळगावी जिल्ह्यात सावकार म्हणून ओळखले जाते. सतीश जारकीहोळी 2008 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले आणि तेव्हापासून त्यांनी किमान तीन वेळा मंत्री म्हणून काम केले आहे.

के एच मुनियप्पा -

कंबादहल्ली हनुमप्पा मुनियप्पा यांनी सलग सात वेळा कोलार लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. ते माजी केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

रामलिंगा रेड्डी -

रामलिंगा रेड्डी हे कर्नाटकचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. रामलिंगा रेड्डी यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. इंदिरा गांधी आणि डी. देवराज यांच्या दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांनी प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जमीर अहमद खान -

जमीर अहमद खान हे कर्नाटकातील चामराजपेट विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार आहेत आणि नॅशनल ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापकीय भागीदार देखील आहेत. जमीर अहमद खान हे मागील कर्नाटक सरकारमध्ये हज आणि वक्फ बोर्डाचे मंत्री राहिले आहेत.

एम बी पाटील -

मल्लनगौडा बसनगौडा पाटील यांनी कर्नाटकचे गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय एम.बी.पाटील यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. पाटील हे पाचव्यांदा निवडून आले आहेत. ते प्रभावशाली लिंगायत समाजाचे आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now