Madhya Pradesh: चांगला डान्सर बनण्यात अपयशी ठरला, नैराश्यातून तरूणाची आत्महत्या; सुसाईट नोटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली 'अशी' मागणी
चांगला डान्सन बनण्यात अपयशी ठरल्याने एका तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियर (Gwalior) येथून धक्कादायक घटना घडली आहे. चांगला डान्सन बनण्यात अपयशी ठरल्याने एका तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी मृत तरूणाने लिहलेली सुसाईट नोट पोलिसांना सापडली आहे. या नोटमधून त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने गायलेले गाणे आणि नेपाळी कोरिओग्राफर सुशांत खत्री यांनी कोरिओग्राफ केलेला म्यूझिक वीडियो बनवण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली आहे.
झाशी रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी संजीव नयन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरूण हा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी होता. त्याने रविवारी रात्री धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर घटनस्थळी दाखल झालेल्या तरूणाजवळ सुसाईट नोट सापडली. या सुसाईट नोटमध्ये असे लिहले होते की, माझ्या कुटुंबियाकडून मला साथ न मिळाल्याने मला चांगले डान्सर बनता आले नाही. तसेच त्याच्या मृत्युनंतर एक म्युझिक व्हिडिओ बनवण्यात यावा. ज्यात अरिजीत सिंह यांनी गायलेले गाणे आणि सुशांत खत्री यांनी कोरिओग्राफ केलेले असावे, अशी विनंती त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच हा म्युझिक व्हिडिओ त्याच्या आत्म्याला शांती देईल, असेही त्याने सुसाईट नोट मध्ये लिहले आहे. हे देखील वाचा- Four Girls Drown in Dhanavan River: अंघोळीसाठी गेलेल्या 4 मुलींचा नदीत बुडून मृत्यू, बिहारच्या नालंदा येथील घटना
यातच महाराष्ट्राच्या बीड येथे पगार वेळेवर झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. तुकाराम सानप असे मृतांचे नाव असून मागील काही महिन्यांपासून त्यांचा पगार वेळेवर होत नव्हता. ज्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.