Madhya Pradesh Suicide Case: आई ओरडली म्हणून 17 वर्षाच्या मुलीचा आत्महत्या, मध्यप्रदेशातील घटना
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Madhya Pradesh Suicide Case: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौर (Indore) येथे एका तरुणीने क्षुल्लक कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना लासुदिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. शुक्रवारी तरुणीने राहत्या घरात गळफास घेतले.आईने तिला शिवीगाळ केल्याने तिळे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. (हेही वाचा- महाराजाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील धक्कादायक प्रकार)
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली चदना (वय वर्ष 17) असे आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी तिने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला आणि या घटनेत तीचा मृत्यू झाला. अंजली आई सोबत निपानिया काकड येथे राहायची.इयत्ता पाचवीनंतर तिने शिक्षण सोडले होते. अंजलीच्या काकांनी सांगितले की, ती सतत मोबाईलचा वापर करीत असे. सुरुवातीला ती आई सोबत शिवणकाम करायची. शुक्रवारी तिच्या आईने मोबाईलचा वापर कमी कर यावरून समजत होती त्यानंतर दोघांमध्ये भांडण झालं आणि आईने अंजलीला खुप ओरडा दिला.
या गोष्टीचा अंजलीला राग आला आणि तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले, दुपारी २ वाजेच्या सुमारास खोलीत तिने गळफास घेतला. थोड्यावेळाने लहान भावाला ती लटकलेल्या अवस्थेत दिसली.याने ही घटना कुटुंबियांना सांगितली. तीचे वडिल ड्रायव्हर आहेत. तिच्या आई वडिलांची सर्वात मोठी मुलगी होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.