Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलीची वसतिगृहात आत्महत्या,पोलिस चौकशी सुरु

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीने एका वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशात अल्पवयीन मुलीची वसतिगृहात आत्महत्या,पोलिस चौकशी सुरु
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीने एका वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 4.30च्या सुमारास घडली आहे. ही घटना लब्रावाड गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लब्रावाड गावातील एकलव्य असं वसतिगृहात राहत्या खोलीत मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर धार पोलिस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेअंतर्गत मृत मुलीच्या आईवडिलांना चौकशी सुरु केली आहे. (हेही वाचा-  महर्षी विद्यापीठात भरधाव कार विद्यार्थींनीच्या अंगावर, दोन जखमी; )

मिळालेल्या माहितीनुसार, धार जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीने जीवन यात्रा संपवली आहे. तिने टोकाचे पाऊल का उचलले आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. ती नुकतीच सुट्टी संपवून वसतीगृहात परतली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेच्या बहिणीने आणि दोन मैत्रिणींनी तीचा लटकलेला मृतदेह पाहिला. या घटनेची माहिती मुख्यध्यापिकाना देण्यात आली. ते घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद असल्याचे वाटत आहे. आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त ब्रिजकुमार शुक्ला, एसडीएम रोशनी पाटीदार, सीएसपी रवींद्र वास्कले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडित मुलगी 12वीत शिकणारी व मूळची मनवर तालुक्यातील रालामंडल गावची आहे. तपासणी दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे हत्येचा संशय पोलिसांना आला आहे. या घटनेमुळे वसतीगृहात मोठी खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).