Lala Ramswaroop Calendar 2020 For Free PDF Download: नवीन वर्षातील सण, उत्सव आणि सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी मोफत डाऊनलोड करा 'लाला रामस्वरुप कॅलेंडर 2020'

1 जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी नवीन वर्षाचे अगदी धुमधडाक्यात स्वागत केलं. प्रत्येकाला नवीन वर्षामधील सण, उत्सव आणि सुट्ट्याविषयी उत्सुकता असते. त्यामुळे अनेकजण वर्ष संपण्याअगोदरच नवीन कॅलेंडर खरेदी करतात. तसेच काही जण मात्र आपल्या मोबाईलमध्ये डीजिटल कॅलेंडर डाऊनलोड करण्यास प्राधान्य देतात. डिजिटल कॅलेंडरचा आपल्याला मोठा फायदा होतो. हे कॅलेंडरमध्ये आपण आपल्याला हवे तेव्हा पाहू शकतो.

Lala Ramswaroop Calendar 2020 (Photo Credits: Pixabay)

Lala Ramswaroop Calendar 2020 For Free PDF Download: 1 जानेवारीपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी नवीन वर्षाचे अगदी धुमधडाक्यात स्वागत केलं. प्रत्येकाला नवीन वर्षामधील सण, उत्सव आणि सुट्ट्याविषयी उत्सुकता असते. त्यामुळे अनेकजण वर्ष संपण्याअगोदरच नवीन कॅलेंडर खरेदी करतात. तसेच काही जण मात्र आपल्या मोबाईलमध्ये डिजिटल कॅलेंडर डाऊनलोड करण्यास प्राधान्य देतात. डिजिटल कॅलेंडरचा आपल्याला मोठा फायदा होतो. हे कॅलेंडरमध्ये आपण आपल्याला हवे तेव्हा पाहू शकतो.

हिंदू पंचागांमधील (Hindu Panchang) अनेक सण विशिष्ट मुहूर्तावर मोठ्या उत्सहात साजरे केले जातात. त्यामुळे देशभरात 'लाला रामस्वरुप कॅलेंडर'ला (Lala Ramswaroop Calendar 2020) मोठी मागणी आहे. तुम्हाला यंदा संक्रात, होळी, दिपावली, नवरात्री, आदी प्रमुख सणांच्या तारखा आणि मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर, तुम्ही 'लाला रामस्वरुप कॅलेंडर 2020' PDF स्वरुपात येथे मोफत Download करा. 

लाला रामस्वरुप कॅलेंडर 1934 मध्ये सुरू झाले होते. या कॅलेंडरला यावर्षी 87 वर्ष पूर्ण झाले आहेत. या कॅलेंडरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने पंचांग देण्यात आले आहे. यात प्रत्येक सणाची तारीख, मुहूर्त, नक्षत्र आदी माहिती दिली जाते. या कॅलेंडरमध्ये जानेवारी महिन्यात येणाऱ्या गुरु गोविंद सिंह जयंती, भोगी, मकरसंक्रांत, कनुमा, उझावर तिरुनाल, नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती, वसंत पंचमी, सर छोटू राम जयंती, पोंगल, स्वामी विवेकानंद जयंती, महात्मा गांधी पुण्यतिथी आदी सणांचा समावेश आहे. (हेही वाचा - Bank Holidays in January 2020: नवीन वर्ष, प्रजासत्ताक दिन, मकर संक्रांती यासह १० दिवस बॅंक बंद; पाहा जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी)

फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, व्हॅलेंटाईन डे, महाशिवरात्री, गुरु रविदास जयंती, महर्षी द्यानंद सरस्वती जयंती, रामकृष्ण जयंती आदी महत्त्वाच्या सणांचा समावेश आहे. तुम्हालाही वर्षभरातील सणांची माहिती हवी असेल तर तुम्हीही 'लाला रामस्वरुप कॅलेंडर 2020' डाऊनलोड करू शकता.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now