PM Modi Congratulates KP Sharma Oli: केपी शर्मा ओली बनले तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन, दोन्ही देशांमधील संबंधांबाबत केलं 'हे' वक्तव्य

ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, 'आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.'

PM Modi Congratulates KP Sharma Oli (PC - Facebook)

PM Modi Congratulates KP Sharma Oli: के पी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी आज चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेपाळ (Nepal)मधील सर्वात मोठ्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याची रविवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन केले आणि दोन्ही देशांमधील मैत्री आणखी दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

ओली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, 'आम्ही दोन्ही देशांमधील मैत्रीचे सखोल नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि आमच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आमचे परस्पर फायदेशीर सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.' (हेही वाचा -K P Sharma Oli Appointed Nepal's PM: नेपाळच्या पंतप्रधानपदी केपी शर्मा ओली यांची नियुक्ती; उद्या घेणार शपथ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट - 

कमल दहल 'प्रचंड' यांचा विश्वासदर्शक ठरावात पराभव -

72 वर्षीय ओली हे पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांची जागा घेतील, ज्यांनी नुकतेच शुक्रवारी प्रतिनिधीगृहात विश्वासदर्शक ठराव गमावला. ज्यामुळे कलम 76 (2) नुसार नवीन सरकारची स्थापना झाली. संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले. राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत शीतल निवास येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी ओली यांना शपथ दिली. (हेही वाचा - Nepal Govt Recalls 11 Ambassadors: नेपाळने भारत-अमेरिकेसह 11 देशांतील आपल्या राजदूतांना परत बोलावले, जाणून घ्या काय होते कारण?)

संवैधानिक आदेशानुसार, ओली यांना त्यांची नियुक्ती झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत संसदेकडून विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागणार आहे. 275 जागांच्या प्रतिनिधीगृहात ओली यांना किमान 138 मतांची गरज आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now