Jharkhand Gangrape: संतापजनक! सहलीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 22 जणांविरोधात गुन्हा दाखल
ही घटना झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर (Jamshedpur) येथे रविवारी (1 फेब्रुवारी) घडली आहे.
सहलीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर 22 जणांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना झारखंडमधील (Jharkhand) जमशेदपूर (Jamshedpur) येथे रविवारी (1 फेब्रुवारी) घडली आहे. याप्रकरणी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पीडित मुलीची मेडिकल तपासणी करण्यासाठी तिला एमजीएम रुग्णालयात पाठवले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जमशेदपूरच्या परसुडीह येथील रहिवाशी आहे. तिचे आई-वडील दुसऱ्या वस्तीत राहतात. तर, ती आपल्या आजी आजोबांसोबत राहत असल्याचे समजत आहे. पीडित ही मोलकरणीचे काम करत असून रविवारी ती 6 ते 7 तरूणांसोबत सहलीला गेली होती. दरम्यान चांदणी चौक येथील एका शौचालयात तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे. पीडिताने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील काही आरोपी परसुडीह येथील रहिवासी आहेत, तर काहीजण जादुगोडा येथील रहिवासी आहेत. हे देखील वाचा- Rajasthan: पार्कमध्ये खेळायला गेली, पण घरी परतलीच नाही; शेजाऱ्यांनी कळवताच पालकांना बसला मोठा धक्का
दरम्यान, पीडित मुलगी सतत आपल्या विधानात बदल करत आहे. तर, ज्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.