Jallikattu 2020: अवनियापुरम येथे कडक सुरक्षेत जलीकट्टू खेळाला सुरुवात; यंदा 700 बैल होणार सहभागी

या सणाला तब्बल 2000 वर्षांची परंपरा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली असली तरी, राज्याच्या संस्कृतीचा भाग म्हणून अजूनही या खेळाचे आयोजन होते.

Jallikattu event begins in Tamil Nadu (Photo Credits: ANI)

तामिळनाडू (TamilNadu) राज्यात पोंगल (Pongal) सणानिमित्त खेळला जाणारा परंपरागत सण म्हणजे, जलीकट्टू (Jallikattu). या सणाला तब्बल 2000 वर्षांची परंपरा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली असली तरी, राज्याच्या संस्कृतीचा भाग म्हणून अजूनही या खेळाचे आयोजन होते. आज तामिळनाडू राज्यातील विविध शहरांत हा खेळ खेळला जात आहे, त्यामध्ये मदुराई (Madurai) येथील खेळाला विशेष महत्व आहे. मदुराई येथे जल्लीकट्टू उत्सव सुरू झाला असून, त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मदुराईच्या अवनियापुरम (Avaniyapuram) येथे होणाऱ्या या उत्सवात यंदा 700 बैल भाग घेत आहेत.

अवनियापुरममध्ये आज, बुधवारी सकाळी आठ वाजता जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यामध्ये 700 बैलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 730 लोक मैदानात उतरले आहेत. या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी मद्रास हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची समिती गठित केली गेली आहे. बैल व तो नियंत्रित करणारी व्यक्ती त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतरच मैदानात उतरवली जाणार आहे. प्रत्येक तासाला साधारण 75 लोक बैलांवर नियंत्रित करण्यासाठी मैदानात उतरतील.

अवनीपुरममध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 30 सदस्यांचे वैद्यकीय पथकदेखील त्याठिकाणी उपस्थित आहे. यामध्ये डॉक्टर आणि परिचारिका व्यतिरिक्त 10 रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ही टीम वळू आणि त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवेल. (हेही वाचा: Makar Sankranti 2020: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्याचे काय आहे महत्त्व? असा करा यंदाचा लूक)

जल्लीकट्टू काय आहे?

या खेळाचा मुख्य उद्देश बैलांवर नियंत्रण मिळवणे हा आहे. बैलांच्या शिंगाला एक पिशवी बांधली जाते व ती घेऊन बैल हवे तिकडे पळू लागतात. जमलेले युवक या बैलांना पकडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतात. को कोणी हे करून दाखवेल त्याला मोठे बक्षीस देण्यात येते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif