'जैश-ए-मोहम्मद'ची मोठ्या हल्ल्याची तयारी; संदेशासाठी केला 'डार्क वेब'चा वापर

तसेच आता देशातील अनेक सुरक्षा संस्थांनी केंद्र सरकारला दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवली असून सावध राहण्यास सांगितले आहे.

Jaish-E-Mohammad| File Image | (Photo Credits: PTI)

सर्वाच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला राम जन्मूमी अयोध्या आणि बाबरी मशीद वादावरील महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद' (Jaish-e-Mohammed) च्या हालचालींबाबत सतर्क राहण्यास सांगितले होते. तसेच आता देशातील अनेक सुरक्षा संस्थांनी केंद्र सरकारला दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवली असून सावध राहण्यास सांगितले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी संघटनांमधील संदेशाची उकल (डीकोड) केल्याचे सांगण्यात येते आहे. (हेही वाचा - 'जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख मसूद अजहर याचा मृत्यू?; 2 मार्चला पाकिस्तान येथे झाला मृत्यू : सूत्र)

ही माहिती देणाऱ्या गुप्तचर यंत्रणांमध्ये लष्कर, रॉ आणि आयबीचाही समावेश आहे. या सुरक्षा संस्थांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. याविषयी अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अयोध्या प्रकरणाचा निकाल लागण्याअगोदर १० दिवस हल्ल्याच्या शक्यतेशी निगडीत माहित हाती येत होती. दहशतवाद्यांकडून या हल्ल्याशी निगडीत सर्वाधिक चर्चा 'डार्क वेब'च्या माध्यमातून करण्यात आली. ही चर्चा इनक्रिप्टेड आणि कोडमध्ये होती. सुरक्षा संस्थांना यासंदर्भात उलगडा करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.

डार्क वेब काय आहे?

डार्क वेब हे वेबसाईटचे असे एक मायाजाल आहे. जिथे खूप साऱ्या वेबसाईट या सांकेतिक स्वरूपामध्ये बनविलेल्या असतात. या वेबसाईट आपली नेहमीची सर्च इंजिन जसं की, गुगल, याहू, इत्यादीमध्ये शोधून भेटत नाहीत. किंवा आपले नेहमीचे ब्राऊजर जसे की गुगल क्रोम, मोजीला फायरफॉक्स, इत्यादीमध्येही भेटत नाहीत.

हेही वाचा - परवेझ मुशर्रफ यांचा खळबळजनक खुलासा; भारतावर हल्ला करण्यासाठी घेतली होती 'जैश-ए- मोहम्मद'ची मदत

डार्क वेबमधील बहुतेक सर्वच वेबसाईट त्यांची ओळख लपवतात. डार्क वेबमधील वेबसाईट उघडण्यासाठी वापरकर्ता हा संगणकामध्ये तरबेज असणे महत्त्वाचे आहे. डार्क वेबचा वापर हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त होत असला तरी काही लोक अपरिहार्य कारणांमुळेही त्याचा वापर करतात.