Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार; पहा फोटो

त्यामुळे या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आता भारतीय रेल्वेही पुढे आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या काही गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देशातील रुग्णालय कमी पडल्यास रेल्वेच्या कक्षांमध्ये रुग्णांना दाखल करता येणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांच्या कोचेसमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहे. यासंदर्भात एएनआयने माहिती दिली आहे.

Isolation coaches (PC- ANI)

Coronavirus: देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आता भारतीय रेल्वेही (Indian Railways) पुढे आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या काही गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष (Isolation Coaches) तयार केले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देशातील रुग्णालय कमी पडल्यास रेल्वेच्या कक्षांमध्ये रुग्णांना दाखल करता येणार आहे. यासाठी रेल्वे गाड्यांच्या कोचेसमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहे. यासंदर्भात एएनआयने माहिती दिली आहे.

रेल्वेमध्ये तयार करण्यात आलेल्या या वार्डमुळे देशातील सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या शयनयान कोचेसमध्ये तयार करण्यात आलेल्या एका कक्षात केवळ एकाच रुग्णाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोचमध्ये बर्थवर जाण्यासाठी असलेले शिडीदेखील काढून टाकण्यात आली आहे. तसेच कोचमधील बाथरूममध्येही बदल करण्यात आले असून रुग्णांना या बाथरूममध्ये आंघोळीची सुविधा करण्यात आली आहे. (हेही वाचा - Coronavirus Lockdown मुळे घराकडे पायपीट करत जाणाऱ्या कुटुंबाना अन्नपाणी पुरवण्यासह मदत करण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन)

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसेच देशातील रुग्णालयांची संख्या लक्षात घेऊन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वेमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 834 इतकी झाली आहे. यातील 67 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.