Quarantine म्हणजे नेमके काय? कसा झाला हा शब्द प्रचलित, जाणून घ्या सविस्तर

मात्र हे नेमके का आणि कशासाठी हे याची थोडी माहिती करुन घेऊया

Quarantine (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणासह नागरिक आपपापल्या परीने खबरदारी घेत आहे. घराबाहेर पडू नका, गर्दी टाळा असे अनेक संदेश प्रशासनाकडून माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहेत. यात सध्या एक शब्द लोकांच्या तोंडावर ऐकायला मिळत आहे तो म्हणजे क्वारंटाइन (Quarantine). अनेक सिने कलाकारांनी, दिग्गज लोकांनी तसेच सामान्य नागरिकांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे असे सांगण्यात येत आहे. आपल्यापैकी अनेकांना क्वारंटाइन म्हणजे नेमके हे कदाचित माहिती नसेल. कारण अनेकांसाठी हा शब्द जरा नवीन आहे.

क्वारंटाइन म्हणजे स्वत:ला लोकांपासून वेगळे ठेवणे वा एका खोलीत स्वत:ला कोंडून घेणे असा होता. मात्र हे नेमके का आणि कशासाठी हे याची थोडी माहिती करुन घेऊया

क्वारंटाइन हा शब्द कुठून आला?

क्वारंटाइन हा मूळ लॅटीन शब्द आहे. याचा अर्थ होतो ४० दिवसांचा कालावधी. त्याचा अर्थ अलग राहणे, विलगीकरण, किंवा अलग राहणे किंवा किनाऱ्याजवळ येण्याला मज्जाव (जहाजासंदर्भात) असा होतो. यासाठी रुग्णालयात वेगळी खोली देण्यात येते. असे म्हणतात की ब्रिटनमध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा अशा प्रकारच्या व्यवस्थेची सुरुवात झाली. सध्या पसरत चालेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून आपल्याला त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं आहे. कारण संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

हेदेखील वाचा- अकोला जिल्ह्यात उद्यापासून सलग 3 दिवस 'Lockdown', कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

कोणाला असते क्वारंटाइनची गरज?

करोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली व्यक्ती, किंवा ज्याच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसतात अशा व्यक्तीने स्वत:ला घरात क्वारंटाइन करायला हवे. या विषाणूची लागण झाल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो. अशात तुम्ही निष्काळजीपणी दाखवलात तर शेकडो लोकांना लागण होण्याचा संभव असतो. Coronavirus: खबरदार! पळून जाल तर, क्वारंटाईन विभागातून पळणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय करायचे?

1. जर तुमच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे सर्दी, ताप, खोकला आढळून आल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

2. स्वत:ला क्वारंटाइन करायचे असेल तर तुम्हाला स्वतंत्र खोलीत राहावे लागेल.

3. तेथे तुमच्या रोजच्या गरजेच्या वस्तू जसे टॉवेल, जेवणाची भांडी वेगळी असली पाहिजे.

4. तुम्हाला स्वतंत्र शौचालयाचा वापर करावा लागेल. Coronavirus in India: अमिताभ बच्चन, अजय देवगन, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनता कर्फ्यू' आवाहनाला पाठिंबा

5. क्वारंटाइन असताना तुम्हाला कोणीही भेटू शकत नाही किंवा तुम्हीही कोणाच्या संपर्कात येऊ शकत नाही.

6. तुम्ही जरी बंद खोलीत असलात तरीही त्या खोलीत हवा खेळती राहिल अशी व्यवस्था असावी.

7. तुम्ही वापरलेले मास्क 7-8 तासांनी बदलत राहा आणि त्याची नीट विल्हेवाट लावा.

8. असे सलग 14 दिवस केल्यास या विषाणूचा फैलाव होणार नाही आणि तुम्हालाही लवकरात लवकर बरं वाटेल.

असे केल्यास कोरोना व्हायरस विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.