FD Rate Hike: 'या' सरकारी बँकेने ग्राहकांना दिली खूशखबर! आता FD वर मिळणार 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज
सर्वसामान्यांसाठी 3.25 टक्के ते 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.25 टक्के ते 7.00 टक्के व्याज दिले जात आहे.
FD Rate Hike: देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेने (Canara Bank) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात (FD Rate) वाढ केली आहे. यानंतर सर्वसामान्यांसाठी 3.25 टक्के ते 6.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.25 टक्के ते 7.00 टक्के व्याज दिले जात आहे.
सध्या बँकेकडून सर्वसामान्यांना सर्वाधिक 7 टक्के व्याज दिले जात असून ज्येष्ठ नागरिकांना 666 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. (हेही वाचा - Bank Strike: बॅंक कर्मचाऱ्यांचा 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप, बॅंकेच्या व्यवहारांवर होणार मोठा परिणाम)
कॅनरा बँक एफडी व्याज दर -
कॅनरा बँक आता 7 दिवसांपासून 45 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के व्याज देत आहे. गुंतवणूकदारांना 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के व्याज मिळत आहे. यासह, 180 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज दिले जात आहे.
कॅनरा बँक आता गुंतवणूकदारांना एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी आणि दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज देत आहे. याशिवाय, बँकेला 3 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज मिळत आहे.
रेपो दरात सातत्याने वाढ -
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत चार वेळा व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर 4 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.