SSC Recruitment 2021: एसएससी कडून 3261जागांसाठी नोकरभरतीची घोषणा; 25 ऑक्टोबर पर्यंत ssc.nic.in वर असा करा अर्ज
3261 पदांची नोकरभरती यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे
SSC Selection Posts Phase IX 2021 चं नोटिफिकेशन स्टाफ सिलेक्शन कमिशन ( Staff Selection Commission) कडून जारी करण्यात आलं आहे. 3261 पदांची नोकरभरती यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांना ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया 24 सप्टेंबर पासून सुरू झाली असून 25 ऑक्टोबर पर्यंत ती सुरू राहणार आहे. यासाठी ऑनलाईन फी भरण्याकरिता 28 ऑक्टोबर पर्यंतची मर्यादा असेल. नक्की वाचा: UPSC NDA/NA Exam 2021 साठी महिलांकरिता आजपासून रजिस्ट्रेशन सुरू; upsconline.nic.in वर करा नोंदणी.
100 रूपये अॅप्लिकेशन फी उमेदवारांना BHIM UPI,नेट बॅंकिंग, मास्टरकार्ड, रूपे क्रेडीट आणि डेबिट कार्ड किंवा एसबीआय ब्रांचच्या चलन द्वारा काढता येणार आहे. यामध्ये महिला उमेदवार, SC,ST जातीचे उमेदवार, PwD,ESM यांना फी माफ असणार आहे. उमेदवारांना प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळा अर्ज आणि त्यासाठी वेगळी रक्कम भरावी लागणार आहे. हे अर्ज एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळांवर केवळ ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.
उमेदवारांच्या निवडीसाठी एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे. अर्ज ज्या केंद्रांवार केला जाणार आहे तेथेच परीक्षा देण्यासाठी एक रोल नंबर आणि अॅडमिशन सर्टिफिकेट देखील पुरवले जाईल याद्वारा विद्यार्थ्यांना संगणकीय परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.