SBI आता 2 लाख ते 5 लाख पर्यंतच्या व्यवहारांसाठी Rs 20 + GST अधिक आकारणार; 1 फेब्रुवारी 2022 पासून नवा नियम

1 फेब्रुवारी 2022 पासून आयएमपीएस ट्रान्झॅक्शन साठी स्लॅब 2 लाख ते 5 लाख मध्ये ग्राहकांना अधिकचे 20 रूपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे.

SBI (Pic Credit- SBI Twitter)

SBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता Immediate Payment Service अर्थात IMPS ची मर्यादा त्यांच्या ब्रांच मध्ये वाढवण्यात आली आहे. मात्र त्यांच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2022 पासून आयएमपीएस ट्रान्झॅक्शन (IMPS Transaction)  साठी स्लॅब 2 लाख ते 5 लाख मध्ये ग्राहकांना अधिकचे 20 रूपये आणि जीएसटी भरावा लागणार आहे.

आयएमपीएस ही लोकप्रिय पेमेंट सर्व्हिस बॅंकांकडून दिली जाते ज्यामध्ये रविवार आणि सुट्ट्यांच्या वारी देखील 24 X 7 रिअल टाईम मध्ये इंटर बॅंक फंड्स ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आरबीआय ने ऑक्टोबर 2021 मध्ये ही मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. हे देखील नक्की वाचा: SBI Xpress Credit Personal Loan: आता फक्त एका Missed Call किंवा SMS वर मिळेल 20 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या पात्रता व अटी .

नव्या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारी 2022 मध्ये एटीएम मधून कॅश काढणं देखील आता महाग झाले आहे. आता विशिष्ट मर्यादेपलिकडे पैसे काढल्यास त्याचा चार्ज द्यावा लागणार आहे. आरबीआयच्या नियमावलीनुसार, अ‍ॅक्सिस बॅंक किंवा अन्य बॅंके च्या एटीएम मधून मोफत सीमेच्या पलिकडे व्यवहार केल्यास 21 रूपये अधिक आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे.