SBI PO Recruitment 2021: 2000 प्रोबेशन ऑफिसर पदासाठी नोकरभरती; 25 ऑक्टोबर पर्यंत असा करा अर्ज
दरम्यान निवड झालेल्यांना भारतभर कुठेही पोस्टिंग दिली जाणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (The State Bank of India) कडून आज (5 ऑक्टोबर) प्रोबेशन ऑफिसर (Probationary Officer) पदासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 25 ऑक्टोबर पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. या नोकरभरती करिता पात्र भारतीय नागरिकांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान निवड झालेल्या उमेदवाराला देशात कोठेही पोस्टिंग मिळू शकते. ही नोकरभरती आणि त्यासंबंधीचं नोटिफिकेशन एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जारी करण्यात आली आहे. नक्की वाचा: SBI Card ची 'दमदार दस' फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर; 3 ऑक्टोबरपासून घेता येईल लाभ.
SBI PO Recruitment 2021 बाबत माहिती
SBI PO Recruitment 2021 मध्ये यंदा 2,056 जागांवर नोकरभरती होणार आहे. यामध्ये 324 जागा एससी, 162 एसटी, 560 ओबीसी, 200 ईब्लूएस आणि 810 जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांना निवडलं जाणार आहे. या नोकरभरती करिता उमेदवार किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन साठी अंतिम वर्षाला, सेमिस्टरला आहेत ते देखील अर्ज करू शकतात. त्यांना मुलाखतीसाठी बोलावल्यास 31 डिसेंबर 2021 पूर्वी किंवा तोपर्यंत ग्रॅज्युएट झाल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. IDD म्हणजे Integrated Dual Degree असलेल्यांनाही 31 डिसेंबर ही तारीख किंवा त्यापूर्वी पास झाल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. Chartered Accountant किंवा Cost Accountant चे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. इथे पहा नोटिफिकेशन.
दरम्यान अर्ज करणारा उमेदवार 1 एप्रिल 2021 पर्यंत 21 वर्षांपेक्षा लहान नसावा तसेच 30 वर्षापेक्षा मोठा देखिल असू नये. वयाच्या कमाल मर्यादेची मुभा ही SC, ST, OBC, PWD, Ex-Servicemen candidates साठी लागू असणार आहे.
एसबीआय मध्ये भरतीप्रक्रियेसाठी प्रिलिमनरी परीक्षा, मेन्स परीक्षा, इंटरव्ह्यू यांच्याद्वारा उमेदवार निवडला जाणार आहे. प्रिलिमनरी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पास होणार्यांना मेन्स परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर मुलाखती होणार आहेत. प्रिलिमनरी परीक्षा नोव्हेंबर / डिसेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात येऊ शकतात. तर अॅडमिट कार्ड्स नोव्हेंबर 2021 च्या पपहिल्या-दुसर्या आठवड्यामध्ये जारी होण्याची शक्यता आहे.