SBI बॅंकेचे व्याजदार पुन्हा झाले स्वस्त; दिवाळीसोबत आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर MCLR दरांमध्ये 6 व्यांदा कपात

एसबीआय बॅंकेने 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये सलग सहाव्यांदा MCLR च्या दरांमध्ये कपात केली आहे

Representational Image (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी बॅंक अशी ओळख असणार्‍या SBI बॅंकेनेदेखील आपल्या MCLR दरामध्ये 10 bps कपात केली आहे. त्यामुळे आता एसबीआयचा व्याजदर पुढील वर्षभरासाठी 8.15% वरून 8.05% इतका करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दिवाळी सणाच्या आधीच नागरिकांना खूषखबर दिली आहे. 10 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. परिणामी गृह कर्ज, कार लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपातीची घोषणा केली होती. सध्या रिव्हर्स रेपो दर 4.90% तर बॅंक रेट 5.40% इतका करण्यात आला आहे. तसेच मागील 9 वर्षांमधील हा निच्चांकी रेपो रेट आहे. ही सध्या वर्षभरातील सलग सहावी कपात आहे. एसबीआय बॅंकेने 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये सलग सहाव्यांदा MCLR च्या दरांमध्ये कपात केली आहे. SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! ATM चा वापर, पैसे काढण्याची मर्यादा ते कर्ज दर यांच्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून झालेत महत्त्वाचे बदल

 1 ऑक्टोबरपासून SBI च्या ग्राहकांसाठी कर्ज, एटीएमचा वापर यांच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.