Sarkari Naukri SSC Phase VIII Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 1300 जागांवर मेगाभारती; ssc.nic.in वर करा ऑनलाईन अॅप्लिकेशन
मग तुम्ही देखील 1300 विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणार असाल तर त्याच्या संबंधित पात्रता निकष पाहून अर्ज 20 मार्च पर्यंत दाखल करू शकता.
SSC Phase VIII Recruitment 2020 Important Dates: सरकारी नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 1300 जागांवर मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये डायटिशनपासून ते स्टोअर कीपरपर्यंत विविध पदांसाठी इच्छुकांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान यासाठी 20 मार्चपर्यंत उमेदवारांना ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्यासोबतच रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. दरम्यान नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मग तुम्ही देखील 1300 विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणार असाल तर त्याच्या संबंधित पात्रता निकष पाहून अर्ज 20 मार्च पर्यंत दाखल करायला विसरू नका.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासोबतच या भरतीबाबत इच्छुकांना केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कार्यालयांमध्ये अधिक माहिती मिळू शकते. लेखी परिक्षा दिल्यानंतर उमेदवाराची निवड होणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 1300 जागांच्या ऑनलाईन भरतीसाठी आवश्यक माहिती
ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहितीसाठी - ssc.nic.in सोबतच अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखा - 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 मार्च 2020
ऑनलाइन शुल्क भरण्याची कालमर्यादा - 23 मार्च 2020 रात्री 23.59 वाजेपर्यंत
ऑफलाइन चलान भरण्याची कालमर्यादा - 23 मार्च 2020 रात्री 23.59 वाजेपर्यंत
चलानच्या माध्यमातून पेमेंट करण्याची कालमर्यादा - 25 मार्च 2020
ऑनलाईन परीक्षेची तारीख - 10 जून ते 12 जून 2020
इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 100 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान यामध्ये महिला उमेदवार, आरक्षित जातीतील उमेदवार SC/ST),दिव्यांग, एक्स सर्व्हिसमेन यांना शुल्कातून वगळ्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करताना विविध ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून इच्छुकांना शुल्क भरता येऊ शकते.