Debt Recovery Rule: कर्ज वसुली एजंटबाबत आरबीआयचे सक्त नियम; सकाळी 8 पूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर ग्राहकांना करु नयेत फोन, घ्या जाणून

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) अर्थातच आरबीआयने (RBI) बँकांच्या कर्जवसुली एजंट्सबाबत महत्त्वपूर्ण निर्देश (Debt Recovery Rule) जारी केले आहेत. या निर्देशानुसार बँकेचे कर्जवसुली एजंट्स (Debt Recovery Agents) ग्राहकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर फोन करु शकणार नाहीत. म्ह

भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) अर्थातच आरबीआयने (RBI) बँकांच्या कर्जवसुली एजंट्सबाबत महत्त्वपूर्ण निर्देश (Debt Recovery Rule) जारी केले आहेत. या निर्देशानुसार बँकेचे कर्जवसुली एजंट्स (Debt Recovery Agents) ग्राहकांना सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर फोन करु शकणार नाहीत. म्हणजेच सकाळी 8ते सायंकळी सात याच वेळेत कर्जवसुलीसाठी बँकांचे एजंट्स ग्राहकांना फोन करु शकणार आहेत. आरबीआयने अशा आशयाची एक अधिसूचना जारी करत म्हटले आहे की, नॉन-बँक वित्तीय संस्था (Non-bank financial institution) म्हणजेच एनबीएफसी (NBFC) आणि मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (Asset Reconstruction Companies) म्हणजेच ARC (एआरसी) यांनी हे निश्चित करावे की, कर्ज वसुली संदर्भात त्यांना आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करावे.

आरबीआयने म्हटले की, सल्ला दिला जातो आहे की, विनियमित संस्था (Regulated Entities) यांनी हे निश्चित करावे की, त्यांनी त्यांच्या एजंट्सना दिलेल्या कर्जांच्या वसूली दरम्यान कर्जदारांना कोणत्याही प्रकारे छळू नये किंवा त्यांना उचकविण्यापासून दूर राहावे. कोणत्याही कर्जदाराला बँकेच्या वसुली एजंट्सकडून चुकीचा संदेश पाठवणे, धमकी देणे, धमकीचे फोनकॉल करणे किंवा अज्ञात क्रमांकावरुन सतत दबाव टाकणे यांसारखे प्रकार करु नये. आरबीआयने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, कर्ज वसुली एजंट्स कोणत्याही ग्राहकाला सकाळी आठपूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर कर्जासाठी कॉल करु शकत नाहीत.

आरबीाय वेळोवेळी कर्जवसूली संदर्भात विविध मुद्द्यांवर दिशानिर्देश जारी करते. आरबीायने याही आधी म्हटले होते की, संबंधीत कंपन्या, बँका कर्जदारांचा छळ अधवा त्यांच्याशी प्रतारितपणे वागू शकत नाहीत. अलिकडील काही काळात कर्जवसुली एजंट्सकडून करण्यात आलेल्या अनुचित प्रकारामुळे आरबीआय सातत्याने मार्गदर्शक तत्वे आखत असते. तसेच, ही मार्गदर्शक तत्वे जारीही करत असते. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, ही मार्गदर्खस तत्वे सर्व बँका, सहकारी बँका, एनबीएफसी, एआरसी आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू राहतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now