New Year 2023: भारतातील कोणत्या राज्यातील लोक नववर्षाला सर्वाधिक दारू पितात? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? चला तर मग उत्तर जाणून घेऊयात

आज आम्ही तुम्हाला नववर्षाला कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू खरेदी करतात ते सांगणार आहोत.

liquor | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

New Year 2023: आता नववर्षाला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत ज्या राज्यांमध्ये लोक दारू (Alcohol) पितात तेथे दारूची विक्री वाढणार आहे. दरवर्षी लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी करोडोंची दारू खरेदी करतात. आज आम्ही तुम्हाला नववर्षाला (New Year 2023) कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू खरेदी करतात ते सांगणार आहोत.

2023 मध्ये राजस्थानमधील लोकांनी सर्वाधिक दारू रिचवली -

2023 सालच्या उत्सवात राजस्थानमध्ये सर्वाधिक दारू प्यायली गेली. 30 आणि 31 डिसेंबर 2022 रोजी येथे 35.26 कोटी रुपयांची दारू विकली गेली. एकट्या जयपूरमध्ये या दोन दिवसांत 11 कोटी रुपयांची दारू विकली गेली. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर 31 डिसेंबर 2022 रोजी येथे 9 कोटी रुपयांची दारू विकली गेली होती. तर, 2021 मधील या दोन दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, 30-31 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये 77 कोटी 82 लाख रुपयांची दारू विकली गेली. (हेही वाचा - Cancer Risk due to Alcohol: दारूच्या पहिल्या थेंबापासून सुरु होतो 'कर्करोगा'चा धोका; थोडेसे मद्यपानही शरीरासाठी घातक, WHO चा इशारा)

भारतात किती लोक दारू पितात?

आर्थिक संशोधन संस्था ICRIER आणि कायदा सल्लागार कंपनी PLR चेंबर्सच्या अहवालानुसार, भारतात सुमारे 16 कोटी लोक दारू पितात. या संख्येपैकी 95 टक्के पुरुष आहेत. या पुरुषांचे वय 18 ते 49 या दरम्यान आहे. याशिवाय या संख्येतील पाच टक्के महिला दारूचे सेवन करतात. (हेही वाचा - No Vaccines, No Alcohol: आता औरंगाबादमध्ये 'नो लस, नो दारू' मोहिमेला सुरूवात, लसीकरण न केलेल्या तळीरामांना बसणार फटका)

कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू पितात?

क्रिसिल नावाच्या सर्वेक्षण कंपनीने 2020 मध्ये संपूर्ण देशात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, 2020 मध्ये भारतातील पाच राज्ये अशी होती जिथे दारूचे सर्वाधिक सेवन केले जाते. यामध्ये छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर होते. येथील एकूण लोकसंख्येपैकी 35.6 टक्के लोक दारू पितात. त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी 34.7 टक्के लोक दारू पितात. तर आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी 34.5 टक्के लोक नियमितपणे दारू पितात.