PAN-Aadhaar Linking: पॅन कार्डसोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
त्यानंतर 31 मार्च 2023 पर्यंत 1000 रुपये दंड भरून आधार पॅन लिंक करता येणार होते. आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे.
तुमचे पॅनकार्ड (PAN Card) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करणे हे एक महत्त्वाचे काम आहे, जे प्रत्येक भारतीय नागरिकाने पूर्ण करणे आवश्यक आहे. आता पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारने पुढे ढकलली आहे. देशातील नागरिक आता 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकतात. आत्तापर्यंत पॅनशी आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2023 होती, मात्र आता ती 3 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) मार्फत पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख यापूर्वी अनेकदा वाढवण्यात आली आहे.
आधारशी पॅन लिंक करणे 31 मार्च 2022 पूर्वी मोफत होते आणि त्यानंतर 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान त्यासाठी 500 रुपये दंड आकारला गेला. त्यानंतर 31 मार्च 2023 पर्यंत 1000 रुपये दंड भरून आधार पॅन लिंक करता येणार होते. आता ही तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच तुम्ही 1 हजार रुपये दंड भरून 30 जून पर्यंत आधारशी पॅन लिंक करू शकता. परंतु या कालावधीमध्ये तुम्ही असे न केल्यास तुमचा पॅन निष्क्रिय होईल.
पॅनशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सरळ-सोपी आहे आणि तुम्ही ती ऑनलाइन करू शकता. जाणून घ्या याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया-
आधार-पॅन ऑनलाईन लिंक करणे-
ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.
त्यातील होमपेजवर 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर उघडलेल्या पृष्ठावर पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.
सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर बटनवर क्लिक करुन सबमिट बटण दाबा.
(हेही वाचा: EPFO Interest Rate: 2022-23 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याजदर निश्चित)
दरम्यान, बँक अकाउंट खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड वा शेअर खरेदी करण्यासाठी किंवा 50,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रान्जेक्शन करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. मात्र तुमचे पॅन अद्धारशी लिंक नसेल तर, असे सर्व ऑपरेटिव्ह पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह होतील. त्यामुळे लवकरात लवकर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करा.