MMRC Recruitment 2021: मेट्रो मध्ये इंजिनिअर्सना नोकरीची संधी 22 ऑगस्ट पर्यंत करा mmrcl.com वर रजिस्ट्रेशन

19 विविध जागांवर ही नोकरभरती होणार असून ऑनलाईन माध्यमातून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे

Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) कडून इंजिनिअर्स साठी नोकरभरतीची जाहिरात देण्यात आली आहे. 19 विविध जागांवर ही नोकरभरती होणार असून ऑनलाईन माध्यमातून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार 22 ऑगस्ट 2021 पर्यंत mmrcl.com वर रजिस्ट्रेशन करून आपला अर्ज दाखल करू शकतात. जुनिअर इंजिनिअर आणि डेप्युटी इंजिनिअर अशा विविध पदांवर ही नोकरभरती होणार असल्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. SSC Recruitment 2020-21: SSC कडून भारत सरकारच्या मंत्रालय, विभागांमध्ये 7035 पदांवर नोकरभरती जाहीर.

ज्युनियर इंजिनिअर पदावर अर्ज करणारे उमेदवार किमान 35 वर्ष, इलेट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर पदवी धारक असावेत. या पदासाठी 35,280-67,920 या स्केल मधील पगार असणार आहे. तर डेप्युटी इंजिनिअर पदावर अर्ज करणारे उमेदवार किमान 35 वर्ष, इलेट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअर पदवी धारक असावेत. या पदासाठी 50,000 ते 1,60,000 या स्केल मधील पगार असणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी संपूर्ण माहिती नीट वाचण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम केलेल्या उमेदवारांना विविध कामांच्या अनुभवाची पूर्तता असणं आवश्यक आहे. इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन.

महत्त्वाच्या तारखा आणि माहिती

सविस्तर माहिती, ऑनलाईन अर्ज कुठे कराल? - mmrcl.com

अर्ज सुरू कधी होणार - 17 जुलै 2021

अर्जाची अंतिम मुदत - 22 ऑगस्ट 2021

दरम्यान इंजिनिअर पदावर मुंबई मेट्रो मध्ये केल्या जाणार्‍या या नियुक्त्या 3 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट वर केल्या जाणार आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये मुंबई मेट्रो च्या नावाने काही खोटी , बनावट अपॉईंट मेंट लेटर्स देऊन देखील तरूणांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा नोकरीमध्ये अधिकृत संकेतस्थळ आणि कार्यालयातून मिळालेल्याच कागदपत्रांवर, माहितीवर, अधिकृत नोटिफिकेशनवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे