Lightning Facts and Risks: गडगडाटी पावसात आकाशात वीज निर्मिती कशी होते? संभाव्य धोका टाळण्यासाठी आपण काय करावे?

अलिकडे वेगाने होणाऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे वीज कोसळण्याच्या घटणा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. म्हणूनच जाणून घ्या वीज कोसळून होणारा संभाव्य धोका, दुर्घटना टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी.

Lightning | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात आणि अधिमधी इतर वेळी आकाशात ढग येणे, विजा चमकणे, ढगांच्या गडगडाटात किंवा गडगडाट न होताही जमीनीवर आकाशातून वीज कोसळणे ( Lightning Facts and Risks) या तशा सामान्यच गोष्टी. पूर्वंपार चालत आलेल्या. असे असले तरी नैसर्गिक असलेली ही बाब अतिशय धोकादायक ठरु शकतं बरं. अनेकदा अशा घटना पुढे येतात वीज कोसळून नागरिक ठार, प्राणी ठार, जखमी, झाडावर वीज पडली वैगेरे वैगेरे. अलिकडे वेगाने होणाऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे वीज कोसळण्याच्या घटणा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. म्हणूनच जाणून घ्या वीज कोसळून होणारा संभाव्य धोका, दुर्घटना टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यावी.

वीज का पडते?

आकाशात ढगांची मोठ्या प्रमाणावर दाठी असते. प्रचंड प्रमाणावर वाऱ्याचा दाब आणि उष्णता आदींमुळे वाफेचे ढग एका बाजूहून दुसऱ्या बाजूला ढकलले जातात. परिणामी त्यांच्यात घर्षण होते. आणि मेघगर्जनेसह विजनिर्मिती होते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर ढगांच्या तळाशी असलेले नकारात्मक इलेक्ट्रॉन (Negative Electrons) जेव्हा जमीनकडील पॉझिटीव्ह इलेक्ट्रॉन च्या दिशेने झेपावतात किंवा आकर्षिक होतात तव्हा निर्माण होणाऱ्या प्रक्रियेतून विजनिर्मिती होते.

वीज कोसळण्याची शक्यता असल्यास काय करावे

आपण मोकळ्या जागेत असाल आणि जर ढग गडगडू लागले तर उभे न राहता खाली बसा. डोके गुडघ्यात घालून जमीनीकडे तोंड करुन घट्ट डोळे मिटून घ्या. सपाट जमीनीवर बसू नका. तसे केल्याने धोका वाढू शकतो.