Indian Railways कडून 15 पॅसेंजर रेल्वे गाड्या 12 मे पासून धावणार पहा irctc.co.in वर त्याचं E-Tickets कसं बुक कराल?

आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून त्याच ऑनलाईन तिकीटबुकींग आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच irctc.co.in वर सुरू होणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

रेल्वे मंत्रालयाकडून काल भारतात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्येही अंशतः प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल (10 मे) याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 12 मे पासून भारतात नवी दिल्ली येथून देशाच्या ठराविक भागामध्ये 15 गाड्यांची ये-जा सुरू केली जाणार आहे.दरम्यान भारतात 25 मार्च पासून प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 15 रेल्वे गाड्यांच्या येणार्‍या जाणार्‍या अशा 30 फेर्‍या सुरू केल्या आहेत.दरम्यान आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून त्याच ऑनलाईन तिकीटबुकींग आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच irctc.co.in वर सुरू होणार आहे. दरम्यान या रेल्वेच्या फेर्‍या मुंबई सेंट्रल, मडगाव, अहमदाबाद, जम्मू तावी, दिब्रुगड, रांची, भुवनेश्वर, आगरतळा, हावडा, पटना, बिलासपूर,बेंगळूरू, चैन्नई, तिरूअनंतपुरम या स्थानकासाठी सुरू होणार आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंग कशी कराल?

दरम्यान रेल्वेकडून काही प्रमाणात प्रवासी ट्रेन सुरू करण्यात आली असली तरीही याची तिकीट विक्री केवळ ऑनलाईन माध्यमातून करण्यात येणार आहे. देशभरात कुठेही या तिकीटांचं रेल्वे स्थानकांवर विक्री केली जाणार नाही. तसेच प्लॅटफॉर्म तिकीट देखील दिलं जाणार नाही. दरम्यान केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच गाडीत प्रवेश दिला जाईल.