Income Tax Return Filing: आर्थिक वर्ष 2018-19 च्या ITR रिटर्न भरण्यासाठी केवळ 15 दिवस बाकी; e-verification साठी 30 सप्टेंबर शेवटची तारीख

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आर्थिक वर्ष 2019-20 चा टॅक्स फायलिंग तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली. परंतु, आर्थिक वर्ष 2018-19 चा टॅक्स फायलिंग अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.

Income Tax (Photo Credits: Pixabay)

कर भरणे आणि तो वेळेत भरणे हे प्रत्येक पगारदार नागरिकाचे कर्तव्य आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात (Coronavirus Pandemic) आर्थिक वर्ष 2019-20 (Financial Year 2019-20) चा टॅक्स फायलिंग (Tax Filing) तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली. परंतु, आर्थिक वर्ष 2018-19 (FY 2018-19) चा टॅक्स फायलिंग अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. त्यापूर्वी टॅक्स फायलिंग न केल्यास पेन्लटी भरावी लागू शकते. त्यामुळे फायलिंग करण्यासाठी केवळ 15 दिवस बाकी आहेत. ज्या करदात्यांनी 2015-16 ते 2019-20 दरम्यान इन्कम टॅक्स फायलिंग केली आहे. परंतु, ई-व्हेरिफिकेशन करायचे राहिले आहे. अशा करदात्यांसाठी सेंटर्स बँक ऑफ डारेक्ट टॅक्सेसने (Central Bank of Direct Taxes) मुभा दिली आहे.

करदात्यांनी टॅक्स फायलिंग केल्यानंतर 120 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रीया पूर्ण करायची असते. जर ई-व्हेरिफिकेशन्स करायचे राहिल्यास आयटी फायलिंग न केल्याचे मानले जाते. तसंच Income Tax Act for non-filing of return of income च्या विविध कलमांअंतर्गत पेनल्टी लागू केली जाऊ शकते. (आर्थिक वर्ष 2019-20 च्या ITR रिटर्न भरण्याच्या अवधीत पुन्हा एकदा वाढ; 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत रिटर्न फायलिंग करण्याची मुभा)

यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे CBDT कडून आयटी रिटर्न फायलिंगची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता आयटी फायलिंग करण्यास आणि ई-व्हेरिफिकेशन केले नसले तर ते करण्यास केवळ 15 दिवसांची मुदत आहे. इन्कम टॅक्स रिटर्न हे ई-व्हेरिफिकेशन OTP द्वारे किंवा ITR-V ची स्वाक्षरी केलली कॉपी CPC बंगलोरच्या ऑफिसला स्पीड पोस्ट किंवा पोस्टने पाठवून करु शकता.

इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करण्याची पद्धत:

# ई-फायलिंग पोर्टलवर लॉगइन करा. तुमचे बँक अकाऊंट नंबर व्हॅलिडेट करा.

# e-verify लिंकवर जा. तुमचा acknowledgement number टाका.

# e-verify using a bank account number किंवा generate EVC यापैकी एका पर्यायाची  निवड करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर EVC येईल.

# रिटर्न फायलिंग व्हेरिफाय करण्यासाठी हा नंबर पोर्टलवर इंटर करा.

आधार बेस्ड OTP द्वारे ई-व्हेरिफिकेशन करण्याची पद्धत:

# incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

# डाव्या बाजूच्या मेन्यूवरील 'e-Verify return'वर क्लिक करा.

# verify using Aadhaar OTP हा पर्याय निवडा. (आधार-पॅन लिंक असल्यावरच तुम्ही हा पर्याय निवडू शकता.)

# तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.

# हा OTP पोर्टलवर टाकून टॅक्स फायलिंग व्हेरिफाय करा.

पूर्वीच्या आर्थिक वर्षांचे ई-व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असून आर्थिक वर्ष 2019-20 च्या इन्कम टॅक्स फायलिंग करण्याची मूदत ही 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे.