Covid-19 Vaccination Certificate Verification: कोविड 19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट खरं की खोटं हे ऑनलाईन कसे तपासाल?

verify.cowin.gov.in या वेबसाईटवर तुम्हांला Covid-19 Vaccination Certificate ऑनलाईन व्हेरिफाय करता येऊ शकतं.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

भारतामध्ये तुमचं कोविड 19 लसीकरण झाल्याचा एक पुरावा म्हणजे कोविड 19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Covid-19 Vaccination Certificate). कोविन अ‍ॅप वर तुम्हांला पहिल्या आणि दुसर्‍या डोस नंतर हे कोविड 19 वॅक्सिन सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोविड 19 लसीकरणामध्ये नागरिकांची फसवणूक देखील झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे तुमचं सर्टिफिकेट खरं आहे की खोटं हे नेमकं कसं बघायचं? हा प्रश्न तुमच्यादेखील मनात आला असेल तर पहा त्याचं उत्तरं.

दरम्यान व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट हे secure QR code ने सुरक्षित ठेवण्यचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुमच्या सर्टिफिकेट वरील क्यू आर कोडच आता तुम्हांला खरी खोटी माहिती मिळणार आहे. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा सामना करणार्‍या भारतामध्ये आता लसीकरणचा वेग वाढवून कोरोनाची साळखी मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. नक्की वाचा: Covid-19 Vaccine Certificate सोशल मीडियावर शेअर केल्यास होऊ शकते फसवणूक; सरकारचा ट्विटद्वारे इशारा.

Covid-19 Vaccination Certificate ऑनलाईन व्हेरिफाय कसं कराल?

जर तुमचं सर्टिफिकेट योग्य असेल तर तुम्हांला नाव, वय, लिंग, बेनिफिशिअर आयडी, डोसची तारीख, लस कुठे घेतली अशी सारी माहिती दिसेल. मात्र जर सर्टिफिकेट बनावट असेल तर तुम्हांला Certificate Invalid असा मेसेज दिसेल. (COVID-19 Vaccine Certificate: कोविड 19 लसीचा डोस घेतल्यानंतर Aarogya Setu, CoWIN वरून वॅक्सिन सर्टिफिकेट्स डाऊनलोड कशी कराल?).

भारतामध्ये आज (21 जून) पासून केंद्र सरकारकडून मोफत 18 वर्षांवरील सार्‍यांना लस दिली जात आहे. ही मोफत लस सरकारी केंद्रांवर असेल तर खाजगी रूग्णालयांमध्ये सशुल्क लस मिळणार आहे. अद्याप मुंबई मध्ये 30 वर्षांखालील नागरिकांसाठी सरकारी केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif