IPL Auction 2025 Live

Home And Car Loan EMI: वाहन आणि गृहकर्ज व्याजदर वाढल्यावर कसे जुळवाल हप्त्याचे गणित

त्यामुळे अशा नागरिकांना काहीशी मदत व्हावी. त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा यासाठी ही माहिती काहीशी उपयुक्त ठरेन.

Home, Car Loan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

वानह कर्ज (Car Loan) असो की गृहकर्ज (Home Loan) या कर्जांच्या व्याजदरात (Home, Car Loan Interest Rate) बँकांनी कोणताही फेरबदल केल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक गणीतावर होतो. ज्यामुळे महिन्याचे बजेटही कधी कधी कोलमडते. अशा वेळी बँकेंनी व्याजदरांमध्ये केलेले बदल आणि बदलती हप्त्याची (Loan EMI) रक्कम यांचे गणीत कसे जुळवायचे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे अशा नागरिकांना काहीशी मदत व्हावी. त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा यासाठी ही माहिती काहीशी उपयुक्त ठरेन.

कर्जाची रक्कम आणि कर्जाचे हप्ते यांचे गणीत करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वीच विचारात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती आणि कर्जाची परतफेड करण्याची क्षमता विचारात घ्या. प्रतिमहिना आपल्याला किती हप्ता (EMI) सुलभतेने भरता येऊ शकतो? याची माहिती घ्या. त्यानुसार तुम्हाला समान मासिक हप्ते निश्चित करावे लागतील. (हेही वाचा, Home Loan Interest Rates Hike: PNB, ICICI, BoB, BOI ने वाढवले गृहकर्जाचे व्याजदर; तुमच्या EMI वर होणार थेट परिणाम, येथे जाणून घ्या नवीन दर)

कर्ज घेतानाच कर्जाची मुदत किती असेल याबाबत जाणून घ्या. बऱ्याचदा कर्जदाते कर्ज परतफेड कालावधी किंवा EMI ची लांबी वाढवतात. कर्जाचा हप्ता कमी यावा यासाठी ते असे करतात. पण असे करणे बहुतांश वेळा तोट्याचे ठरते. कारण व्याजदरात बदल झाला तर हप्त्यांच्या रकमेतही बदल होतो. शिवाय , दीर्घ कालावधीसाठी कर्जाची मोठी रक्कम तर डोक्यावर असतेच. शिवाय व्याजापोटी पैसेही अधिक जाण्याची शक्यता असते. त्यामुळे परतफेडीचा कालवाधी विचारपूर्वक निवडा.