8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार लवकरचं लागू करणार 8वा वेतन आयोग, वाचा सविस्तर

पुढील वर्षी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती. पण, आता 7व्या वेतन आयोगाच्या ताज्या बातम्यांनंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.

Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

8th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबानी करणार आहे. सरकार त्यांना खूप चांगली बातमी देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7व्या वेतन आयोगानंतर आता 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते. पुढील वर्षी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना ही भेट देऊ शकते. आतापर्यंत 8 वा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती. पण, आता 7व्या वेतन आयोगाच्या ताज्या बातम्यांनंतर पुढील वेतन आयोगाची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पण, सरकार आपला इरादा करत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर पुढील वेतन आयोगाची भेट होऊ शकते.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग गठीत केला जाऊ शकतो. 8व्या वेतन आयोगाच्या वेळीच कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वात मोठी वाढ होणार आहे. हे प्रकरण पुढे सरकत आहे, असे खात्रीने म्हणता येईल. नव्या वेतन आयोगात काय येणार आणि काय नाही, हे सांगणे घाईचे असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. कारण, त्याची संपूर्ण जबाबदारी वेतन आयोगाच्या अध्यक्षांची असेल. (Aadhaar Card मोफत अपडेट करण्याचा आजचा शेवटचा दिवस; 10 वर्ष जुनं आधार कार्ड असणार्‍यांनी तातडीने पूर्ण करा हे काम!)

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा देखील होऊ शकते. त्यांच्या देखरेखीखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असून त्यानंतर कोणत्या सूत्राने पगार वाढवायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आठवा वेतन आयोग कधी येणार?

जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, 2024 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जावा. त्याचबरोबर दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, असे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. 7 व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8 व्या वेतन आयोगात अनेक बदल शक्य आहेत. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात.