फास्टटॅग बारकोड मिळवा टोल नाक्यावरची अडचण टाळा; सोमवारपासून देशभरातील पेट्रोल पंपांवर उपलब्ध
जे वाहनांना लावले जाईल. यात तुमचा कोड बँक खाते किंवा पेटीएम खात्याशी लिंक केलेले असेल. आजवर तुम्ही टोल नाक्यावर गाडी थांबवून टोल भरत होतात. आता तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज नाही.
देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाके (Toll-Booth) लवकरच हायटेक प्रणालीशी जोडले जाणार आहेत. त्यासाठी टोल नाक्यांवर फास्टटॅग लेन सक्तीची केली जाणार आहे. येत्या मार्चपासून फास्टटॅग बारकोड (FASTags Barcode) यंत्रणा सक्तीची केली जाईल. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सरकारही सज्ज झाले आहे. सर्व वाहनचालकंना फास्टटॅग बारकोड मिळावा यासाठी देशभरातील 800 पेट्रोल पंपांचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून फास्टटॅग बारकोड पेट्रोलपंपांवर (Petrol Pumps) मिळणार आहेत. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) हे बारकोड उपलब्ध करुन देत आहे. येत्या ६ महिन्यांत देशभरातील २५ हजार पेट्रोल पंपांवर फास्टटॅग बारकोड उपलब्ध करुन देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे.
प्राप्त माहितीनुसार फास्टटॅगसाठी साहाय्यक दोन अॅपही लाँच केले जाणार आहेत. प्रत्येक टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी लागणारी वाहनांची रांग आणि वाहनचालकांचा जाणार वेळ यांपासून या सेवेमुले सुटका मिळणार आहे. एका सर्व्हेनुसार फास्टटॅग नसलेल्या एका वाहनाला टोलनाक्यावर सरासरी ६ मिनिटांचा वेळ लागतो.
फास्टटॅग बारकोड आणि फास्टटॅग लेन महत्त्वाचे मुद्दे
- रस्ते परिवहन मंत्रालय व एनएचएआय यांच्या टोलची एकूण संख्या 479
- 479 टोलपैकी फास्टटॅग लेन असलेल्या टोलची संख्या एकूण 425
- येत्या मार्चपासून सुमारे 54 फास्टटॅग लेन सुरुवात केली जाणार
- फास्टटॅग बारकोड टप्प्याटप्याने राबवणार त्यासाठी ६ महिन्यांच्या आत मोठ्या शहरांतील २५ हजार पेट्रोल पंपांवरही ही सुविधा उपलब्ध होणार
- वाहनचालक फास्टटॅगला बँक खाते, पेटीएम आदींशी लिंक करता येणार
(हेही वाचा, कर्जबुडव्यांना लगाम, एकाच क्लिकवर कर्जदाराची कुंडली; 'आरबीआय'चे डिजिटल पाऊल)
फास्टटॅग बारकोड आणि फास्टटॅग लेन फायदे
- टोल भरण्यासाठी वाहनचालकांचा जाणारा वेळ वाचणार
- टोल नाक्यांवर होणारी वाहनाची रहदारी कमी होणार
- एखाद्या चालकाने नियम मोडत घुसखोरी केल्यास दंडाची तरतूद
काय आहे फास्टटॅग
हे एकप्रकारचे बारकोड स्टिकरच आहे. जे वाहनांना लावले जाईल. यात तुमचा कोड बँक खाते किंवा पेटीएम खात्याशी लिंक केलेले असेल. आजवर तुम्ही टोल नाक्यावर गाडी थांबवून टोल भरत होतात. आता तुम्हाला रोख पैसे देण्याची गरज नाही. फास्टटॅगयुक्त वाहने टोलच्या एंट्री गेटवर जाताच गेटवरील सेन्सर फास्टटॅग स्कॅन करून त्याची माहिती कंट्रोल रूमला देतो. ऑनलाइन टोल भरून बॅरिअर उघडले जाते. ज्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे.